Delhi Farmer Protest : आंदोलनात आणखी एका शेतकऱ्यांनं गमवला प्राण!

Farmer Protest Delhi : १३ फेब्रुवारीपासून पुकारण्यात आलेले दिल्ली चलो आंदोलनात खनौरी सीमेवर सहभागी होते. दर्शन सिंग यांच्या कुटुंबाला सरकारनं भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय किसान युनियन एकता सिंधुपुर संघटनेचे सरचिटणीस रेशम सिंग यांनी केली आहे.
Delhi Farmer
Delhi FarmerAgrowon
Published on
Updated on

Delhi News : शेतकरी आंदोलनात अजून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमधील भट्टीडा जिल्ह्यातील अमरग्रह गावातील दर्शन सिंग असं शेतकऱ्यांचं नाव आहे. ते ६२ वर्षांचे होते. सकाळी ११ वाजता दर्शन सिंग यांची तब्येत अचानक बिघडली.

त्यामुळं त्यांना जवळच्याच पटरान कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये भरती करण्यात आलं. पण एमर्जन्सीमुळे त्यांना राजेंद्र हॉस्पिटल पटियाला येथे हलवण्यात आलं. तिथे सिंग यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

१३ फेब्रुवारीपासून पुकारण्यात आलेले दिल्ली चलो आंदोलनात खनौरी सीमेवर सहभागी होते. दर्शन सिंग यांच्या कुटुंबाला सरकारनं भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय किसान युनियन एकता सिंधुपुर संघटनेचे सरचिटणीस रेशम सिंग यांनी केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १३ फेब्रुवारीपासून एकूण ५ शेतकऱ्यांनी प्राण गमवला आहे.

(ॲग्रो विशेष)

Delhi Farmer
Farmer Protest : पोलिस-शेतकरी संघर्षात पंजाबाच्या २४ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; सीमेवर तणाव वाढला

खनौरी सीमेवर बुधवारी हरियाणा पोलिसांच्या हल्ल्यात आंदोलक शेतकरी शुभकरण सिंग यांचा मृत्यू झाला. त्यावरून शेतकरी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शंभू आणि खनौरी सीमेवर तणाव वाढला. परंतु त्यानंतर शेतकरी नेत्यांनी दोन दिवस दिल्ली चलो आंदोलन स्थगित केलं.

श्रवण पंढेर यांनी पंजाब सरकारशी शुभकरण यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी केली होती. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुभकरण सिंगच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये आणि शुभकरणच्या बहिणीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. तसेच दोषीवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. पण १४ तास उलटून गेले तरी अजूनही पंजाब सरकारनं कुठलंही उत्तर दिलं नाही, अशी टीका श्रवण पंढेर यांनी केली.

दर्शन सिंग यांच्या कुटुंबाकडे ९ एकर जमीन आहे. पण ट्यावर ९ लाख कर्ज आहे. अशी माहिती दर्शन सिंग यांचे नातेवाईक लखवीर सिंग यांनी दिली. हमीभाव कायदा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, कर्जमाफी आदि मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी दिल्ली चलो आंदोलन पुकारलं आहे. मात्र दिल्लीपासून अंदाजे २०० किलोमीटर अंतरावर शंभू सीमेवर हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com