Delhi Farmer Protest : आंदोलक शेतकऱ्यांचे दिल्ली चलो; सरकारचे पुन्हा चर्चेचे आवाहन

Farmer Protest Update : दिल्लीकडे जाण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सकडे जाण्याचा प्रयत्न केला त्या वेळी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हरियाना पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon
Published on
Updated on

Chandigarh News : शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २१) दिल्लीकडे जाण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सकडे जाण्याचा प्रयत्न केला त्या वेळी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हरियाना पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

तर संभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. यात अनेक शेतकरी जखमी झाले. दरम्यान, या पूर्वी चर्चेच्या चार फेऱ्यांनंतरही शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा निघू शकला नव्हता. आता सरकारने पुन्हा शेतकरी नेत्यांना पुन्हा चर्चेचे आवाहन केले आहे.

पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमीसह प्रमुख तीन मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. रविवारी शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या चौथ्या बैठकीत पाच वर्षांसाठी सरकारी एजन्सींकडून डाळी, मका आणि कापूस या एमएसपीने खरेदी करण्याचा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारला होता.

तसेच बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा चलो दिल्ली आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आंदोलकांपैकी काहींनी हरियानातील अंबालाजवळील शंभू येथील बहुस्तरीय बॅरिकेड्सकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना पांगवले. काही काळ शांततेनंतर पुन्हा असाच प्रकार घडला. या वेळी पोलिसांनी लाठीमारही केला त्यात काही शेतकरी जखमी झाले.

Farmer Protest
Farmer Protest Delhi: २१ फेब्रुवारीला आंदोलक शेतकरी दिल्लीकडे कूच करणार; बॅरीकेड्समधून मार्ग काढण्यासाठी सीमेवर शेतकऱ्यांनी उतरवले जेसीबी!

पंजाब-हरियाना सीमेवरील खनौरी येथेही असाच प्रकार घडला. हरियाना पोलिसांनी बॅरिकेड्सकडे जणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे खनौरी सीमेजवळील परिसरात धुराचे लोट पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

शेतकरी संघटनांनी बुधवारी ‘चलो दिल्ली’चे आवाहन केले असले तरी शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांना सीमावर्ती ठिकाणी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त किसान मोर्चा (अ-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा ‘दिल्ली चलो’ मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. ज्यात पिकांसाठी एमएसपीची कायदेशीर हमी आणि शेतकरी कर्जमाफी यासह त्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी शेतकरी सरकारकडे करत आहेत.

Farmer Protest
Delhi Farmers Protest : केंद्र सरकारने दिला ‘एमएसपी’चा नवा प्रस्ताव

शंभू सीमेवर मानवी साखळी

दिल्लीच्या दिशेने कूच करण्यासाठी शेतकऱ्यांनी शंभू सीमेवर मानवी साखळी उभारली होती. एका बाजूला शेतकऱ्यांचे जेसीबी आणि ट्रॅक्टर तर दुसऱ्या बाजूला सुरक्षा दले आणि निमलष्करी दलाचे जवान असे चित्र पाहायला मिळाले. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

हरियाना पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा केला. दिल्लीभोवतीच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून गाझीपूर, टिकरी, नोएडा आणि सिंघू सीमेवर पोलिसांनी अडथळे उभारले आहेत. याच ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाय योजण्यात आले आहेत.

दिवसभरात :

- खानौरी सीमेवर आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा

- शंभू सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अनेक जखमी

- कृषिमंत्र्यांसोबतची शेतकऱ्यांची चर्चा निष्फळ

- किसान युनियनकडून विशेष अधिवेशनाची मागणी

- शेतकऱ्यांच्या मागण्यांना काँग्रेसचा पाठिंबा

- भटिंडा-दाबवाली सीमेवर देखील शेतकरी धडकले

- केंद्राचे शेतकरी नेत्यांना पुन्हा चर्चेचे आवाहन

- शंभू, खानौरी सीमेवर ४ हजार ८०० पोलिस तैनात

- शेतकऱ्यांना जेसीबी काढून टाकण्याच्या सूचना

- पंजाबला कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या सूचना

- सरकारकडून १७७ सोशल मीडिया अकाउंट बंद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com