Nashik News : द्राक्षनिर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी, तपासणी, कीड व रोगमुक्त हमी, ॲगमार्क प्रमाणीकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण या सर्व बाबींचे अपेडाच्या सहकार्याने ‘ग्रेपनेट’ प्रणालीद्वारे प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्यात येते.
राज्यात द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर असून २०२३-२४ वर्षासाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागेची ऑनलाइन नोंदणी ३१ डिसेंबरपर्यंत करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केली आहे.
युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरिता कीड व रोगमुक्त, उर्वरित अंश हमी देण्यासाठी २००४ पासून राज्यात अपेडाच्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणलीद्वारे नोंदणी करण्यात येते. २०२२-२३ मध्ये ३१ हजार ८११ निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात आली.
निर्यातीसोबतच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना कीड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी २०२३-२४ साठी जिल्ह्याला ४४ हजार ६०० द्राक्ष बागांची नोंदणीचे लक्ष्यांक देण्यात आले आहे.
या वर्षात जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. युरोपमध्ये द्राक्ष निर्यात करताना ‘अपेडा’च्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीत द्राक्ष बागांची नोंदणी आवश्यक असते.
मात्र चालू हंगामात दुष्काळसदृश परिस्थिती, मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपीट अशा अडचणीमुळे द्राक्ष गोडीबहर छाटण्या जवळपास एक महिना लांबणीवर गेल्या. परिणामी, हंगाम प्रभावित झाल्याची स्थिती होती छाटणीची कामे एकदाच दाटल्याने अनेक भागांत मजुरांची टंचाई दिसून आली.
अशा आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात शेतकऱ्यांनी हंगाम मोठ्या कष्टाने उभा केला आहे. त्यात निफाड तालुक्यात गारपिटीने नुकसान वाढले आहे. त्यामुळे लक्ष्यांक दिला असताना तो कमी होतो की पूर्ण होतो हे यंदा पाहणे अपेक्षित आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.