Solapur Grape Export : सोलापुरात निर्यातक्षम द्राक्ष बागांची ‘शून्य’ नोंदणी

Solapur Grape Production : निर्यातीसाठी आवश्यक कृषी विभागाकडील नोंदीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निरुत्साह दिसत आहे. आतापर्यंत फक्त डाळिंब आणि कांदा निर्यातीसाठी बऱ्यापैकी नोंदणी झालेली आहे.
Grape Export
Grape ExportAgrowon
Published on
Updated on

Solapur News : निर्यातीसाठी आवश्यक कृषी विभागाकडील नोंदीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा निरुत्साह दिसत आहे. आतापर्यंत फक्त डाळिंब आणि कांदा निर्यातीसाठी बऱ्यापैकी नोंदणी झालेली आहे. पण द्राक्षाचे क्षेत्र लक्षणीय असूनही निर्यातक्षम द्राक्ष बागांची केवळ ‘शून्य’ नोंदणी झाली आहे.

सोलापूर द्राक्ष, डाळिंब, ऊस, कांदा या पिकांच्या उत्पादनातील आघाडीवरचा जिल्हा आहे. जिल्ह्यात डाळिंबाचे ४७ हजार ३७७ हेक्टर, द्राक्षाचे १६ हजार २० हेक्टरवर क्षेत्र आहे. आंब्याचे १७३१ हेक्टर, कांदा ७७ हजार ८६६ हेक्टर आणि भाजीपाल्याचे ११ हजार १७३ हेक्टरवर क्षेत्र आहे.

Grape Export
Grape Export : सांगलीतून १६ हजार टन द्राक्षाची निर्यात

यापैकी बराचसा शेतीमाल स्थानिक बाजारात जात असला, तरी निर्यातीतही या पिकांची आघाडी आहे. या पिकांची नोंद त्या त्या नेटवर केली जाते. त्यासाठी कृषी विभागाकडून ऑनलाइनपद्धतीने पीकनिहाय स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आली आहे.

ही नोंदणी निर्यातक्षम पिकांसाठी बंधनकारक आहे. दरवर्षी बहुतांश इच्छुक शेतकरी ती अगदी नियमितपणे करतात, पण यंदा या नोंदणीकडे विशेषतः द्राक्ष बागायतदारांनी पुरता निरुत्साह दाखविल्याचे चित्र आहे.

Grape Export
Grape Export : सांगलीतून परदेशातील द्राक्ष निर्यातीत १४७६ टनांनी वाढ

द्राक्षासाठीच्या ग्रेपनेटवर गेल्या वर्षी २ हजार ३१० निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या प्लॉटची नोंदणी झाली होती. यंदा मात्र ती शून्य इतकी आहे. आतापर्यंत एकही बागायतदाराने त्यावर नोंदणी केलेली नाही. डाळिंबाचे गतवर्षी २५०० प्लॉट नोंदले गेले होते.

यंदा ९९४ प्लॉटची नोंदणी झाली आहे. आंब्याचीही गेल्या वर्षी २०० प्लॉटची नोंदणी झाली होती. यंदा त्याचीही नोंद झालेली नाही. लिंबाची गेल्या वर्षी १०० प्लॉटची नोंदणी, तर यंदा केवळ २ प्लॉटवर आहे. तर कांद्याची गतवर्षी ९०० प्लॉटची नोंदणी यंदा केवळ ४५० वर आहे.

आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत. शेतकरी गटांना, वैयक्तिक शेतकऱ्यांनाही निर्यातीसाठी प्रोत्साहित करतो आहोत. कांदा, डाळिंबाचे शेतकरी नोंदी करताहेत. मात्र द्राक्षासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील.
- राजकुमार मोरे, कृषी उपसंचालक, कृषी विभाग, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com