
Sindhudurg News: मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील सुमारे १५०० हेक्टरवरील कोकम (रातांबा) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी कोकम सरबत, कोकम आगळ, कोकम सोल, कोकम तेलाचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्गात साधारणपणे १५०० हेक्टरपर्यंत कोकम पिकांची लागवड आहे. या पूर्ण लागवड क्षेत्राचे नुकसान झाले आहे. किनारपट्टी भाग आणि मुबलक पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात कोकम पिकांची लागवड आहे. कोकम काढणीचा हंगाम साधारणपणे एप्रिल अखेर ते मे अखेरपर्यंत चालतो.
स्थानिक जातीच्या झाडांना तर मे महिन्यातच बहर येतो. कोकम काढणीनंतर त्यावर प्रक्रिया करून अधिकत्तर सोल, कोकम सरबत, कोकम आगळ आणि कोकम तेल यासह विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते. कोकम सोल हे कोकणात घरोघरी वापरले जाते. अलीकडील दहा-पंधरा वर्षांत कोकम सोल व्यवसायामध्ये देखील वृद्धी झाली आहे.
कोकमवर प्रक्रिया करून कोकम सरबत, आगळ मोठ्या प्रमाणात बनविले जाते. कोकम प्रकियेकरिता साधारणपणे काढणीनंतर किमान दहा ते बारा दिवस चांगल्या उन्हाची गरज असते. परंतु यावर्षी जिल्ह्यात ८ मेपासून पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला अवकाळीने झोडपले. त्यानंतर मॉन्सूनपूर्व पाऊस बरसला आणि २५ मे लाच मॉन्सून कोकणात दाखल झाला.
त्यामुळे कोकम काढणीला शेतकऱ्यांना संधीच मिळाली नाही.ज्या शेतकऱ्यांची कलम लागवड आहे, अशा शेतकऱ्यांनी थोडीफार काढणी केली. मात्र ज्यांची स्थानिक झाडे आहेत त्यांचे पीक पुरते वाया गेले आहे. परिपक्व झालेले रातांबे झाडावरून गळून पडले आणि मातीमोल झाले. त्यामुळे यावर्षी कोकम उत्पादनांचा तुटवडा जाणवणार आहे. याशिवाय कोकम उत्पादनांचे दर देखील वाढण्याचा अंदाज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.