
Ratnagiri News: आंबा-काजू पिकांप्रमाणे वातावरणातील बदलांचा परिणाम सलग दोन वर्षे कोकम उत्पादनावर झाला आहे. रातांब्याचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले आहे. त्याचा फटका प्रक्रिया पदार्थांच्या किमतीवर दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६०० हेक्टरवर कोकमची लागवड आहे.
कोकमचे उत्पादन हे सर्वसाधारण एप्रिल महिन्यात सुरू होते. यावर्षी अजून एप्रिल महिना संपत आला तरी काही ठराविक ठिकाणीच कोकमच्या झाडाला किरकोळ प्रमाणात फळे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षी ३० ते ४० टक्केच फळधारणा होईल, अशी शक्यता आहे. यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल. तसेच यंदा पीक मे च्या अखेरीस येईल असे चित्र आहे.
गेल्या वर्षी सुमारे ६० टक्केच उत्पादन आले होते. एका बागायतदाराने दिलेल्या माहितीनुसार प्रक्रियेसाठी दरवर्षी ४०० बॅरल (एक बॅरलमध्ये ४० किलो) रातांबे आवश्यक असतात. मात्र गतवर्षी अवघे १०५ बॅरलच रातांबे मिळाले होते. यंदाही जवळपास अशीच स्थिती आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला फटका बसणार आहे.
कोकमच्या प्रत्येक घटकाचा वापर करून पदार्थ बनविण्यात येतात. त्याचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो. कोकमच्या सालीपासून आमसुले, गरापासून कोकम सरबत, बियांचा उपयोग तेलासाठी केला जातो. कोकम आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचे असून ते औषधीही आहे. त्या पदार्थांना भरपूर मागणी आहे. या उत्पादनावर कोकणातील अनेक कुटुंबांची उपजीविका चालते. अनेक तरुण या व्यवसायाकडे वळत आहेत.
उत्पादन घटण्याची कारणे
कोकमसाठी उष्ण आणि दमट हवामान मानवते. रोपांपासून वाढणारे झाड सरळ वाढते; मात्र त्यामध्ये ५० टक्के नर आणि ५० टक्के मादी झाडे निपजतात. त्यामुळे लागवड केल्यानंतर ५० टक्के झाडांपासूनच किफायतशीर उत्पादन मिळते. वातावरण बदलाचा परिणाम सर्वच फळांवर होत आहे. तसा कोकमवरही झाला आहे. कोकमाची नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडे असतात.
त्यावर एकाचवेळी फुले आली तर परागीभवन व्यवस्थित होते. त्यामधून चांगले उत्पादन मिळते. एका झाडाला उशिरा फुले आली तर मात्र उत्पादन घटते. हे चित्र गेली दोन वर्षे दिसत आहे. तसेच कोकमची लागवड सर्वसाधारणपणे पाणवठ्याजवळ केली जाते. गेल्या काही वर्षात पाणवठे उन्हाळ्यापूर्वीच कोरडे पडत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील चरवेलीजवळ हे चित्र दिसते आहे. पाणी न मिळाल्यानेही उत्पादनावर परिणाम होत आहे, असे संशोधकांनी सांगितले.
दर वधारले
कोकम सरबताचे दर पूर्वी ९५ रुपये लिटर होते. आता त्यात १० रुपयांनी वाढ झालेली आहे. तसेच १५५ ते १६० रुपये किलोने मिळणारे आमसूल २३० रुपये किलोने विकले जात आहे. तसचे प्रक्रियेसाठी आवश्यक रातांबे पूर्वी २८ ते ३० रुपये किलोने घेतले जात होते. ते आता ४८ ते ५० रुपये किलोने घ्यावे लागत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.