Crop Damage News : ओझरखेड, तिसगाव, पुणेगाव आवर्तनामुळे पिकांचे नुकसान

Agriculture Irrigation : सध्या पाणी सोडण्याची गरजही नाही. तरीही या धरणांतून आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसानीसह मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Nashik News : पावसाअभावी खरीप हंगाम अडचणीत गेला. असे असताना ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव धरणांत पाणीसाठा तुलनेत कमी आहे. सध्या पाणी सोडण्याची गरजही नाही. तरीही या धरणांतून आवर्तन सोडण्यात आले आहे.

त्यामुळे पिकांचे नुकसानीसह मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. भाजीपाला व द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, दिंडोरी व चांदवड तालुक्यांतील शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.

आवर्तन तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात चालू वर्षी सरासरीच्या अवघे ६० टक्के पर्जन्यमान आहे. तर धरणसाठ्यात १५ टक्के तूट आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत वितरित

अशा परिस्थितीत पाणी टंचाई गंभीर वळणावर असताना खरीप आवर्तनाच्या नावाखाली शेतकऱ्यांची मागणी म्हणून पाणी सोडले जात आहे. नुकत्याच झालेल्या पाणी टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांच्यासमोर त्याचे पडसाद उमटले होते. त्यावेळी शेतकऱ्यांचा विरोध पाहायला मिळाला. मात्र तरीही या प्रश्नांवर पुढे काहीच होत नसल्याची चर्चा आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचितच

असे असताना जिल्ह्यातील एक मंत्री व एक आमदाराने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आवर्तन कायम ठेवल्याची चर्चा आहे. ओझरखेड धरणातील आवर्तनामुळे सोनजांब, शिंदवड, खेडगाव, वडनेरभैरव, आंबेवणी आदी गावांत टोमॅटो, भाजीपाला व द्राक्ष बागांची हानी झाली आहे.

‘‘पुढच्या टप्प्यात पिण्यासाठी व शेतीला पाणी देण्यास हरकत नाही, पण त्याचे नियोजन योग्य पद्धतीने करावे. कालव्याचे पाणी बंद न केल्यास आंदोलन करू,’’ असा इशारा माजी आमदार धनराज महाले यांनी दिला.

पुणेगाव धरणातून पाण्याचे आवर्तन गुरुवारी (ता.१२) सकाळी बंद केले आहे. ओझरखेड डाव्या कालव्याच्या टेल भागात वितरिका क्र. २६ ते ३२ दरम्यान मागणी असल्याने आवर्तन सुरू आहे. मात्र पुढील टंचाई लक्षात घेऊन ते बंद करण्याचे विचाराधीन आहे.
- वैभव भागवत, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग.
पाणी प्रवाह अधिक असल्याने शेतात पाणी जाऊन नुकसान वाढले आहे. ज्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी नाही तर भलत्याच ठिकाणी पाणी जात आहे. अपेक्षित पाऊस नाही. त्यात धरण रिकामे केले जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कसे नियोजन करणार?
- अशोक भालेराव, उपाध्यक्ष, तिसगाव धरण पाणी वापर संस्था महासंघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com