Crop Damage Compensation : परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत वितरित

Heavy rain Crop Damage : परभणी जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील यावर्षी (२०२३) जून व जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या २०१ शेतकऱ्यांसाठी २७ लाख ७४ हजार ९५० रुपये प्राप्त निधी संबंधित तालुक्यांना वर्ग करण्यात आला आला आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील यावर्षी (२०२३) जून व जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या २०१ शेतकऱ्यांसाठी २७ लाख ७४ हजार ९५० रुपये प्राप्त निधी संबंधित तालुक्यांना वर्ग करण्यात आला आला आहे.

शुक्रवारपर्यंत (ता. २०) पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे (डीबीटी) अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.

Crop Damage
Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांच्या मदतीसाठी २०४ कोटींचा निधी

यावर्षी जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली मंडले) परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, सेलू, जिंतूर या ४ तालुक्यांतील ३१ गावांतील २०१ शेतकऱ्यांच्या बागायती क्षेत्रातील ०.२० हेक्टर व फळपिकांखालील १२३.१८ हेक्टर असे एकूण १२३.३८ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते.

बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १७ हजार रुपयेनुसार ३ हजार ४०० रुपये तर फळपिकांसाठी प्रतिहेक्टरी २२ हजार ५०० रुपयांनुसार २७ लाख ७१ हजार ५५० रुपये असे दोन्ही मिळून एकूण २७ लाख ७४ हजार ९५० रुपये निधीची मागणी ३१ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाने केली होती. त्यानुसार शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : संत्रा-सोयाबीन उत्पादकांना भरपाईचा प्रस्ताव ः विखे

पात्र शेतकऱ्यांना मदतीचा निधी प्रचलित पद्धतीऐवजी महा आयटी यांच्याकडून विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीवर वितरित करावा. अनुदान वितरणाची प्रक्रिया शुक्रवारी (ता. २०) पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी गावडे यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.

अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांना निधी वितरण स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये), अनुदान (रुपये)

तालुका बाधित गावे बाधित क्षेत्र बाधित शेतकरी वितरित अनुदान

पाथरी २३ ११०.२२ १८४ २४,७९,९५०

मानवत ६ १०.९६ १२ २,४६०००

सेलू १ २ ४ ४५,०००

जिंतूर १ ०.२० १ ३,४००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com