Agriculture Cultivation : मूग, चवळी लागवडीचे तंत्र

Mung and Cowpea Farming : कमी कालावधीत, अल्पशा पावसाच्या पाण्यावर चांगला आर्थिक फायदा देणारे मूग आणि चवळी ही महत्त्वाची पिके आहेत. आंतरपीक पद्धतीसाठी ही पिके फायदेशीर ठरते. अपेक्षित उत्पादनासाठी शिफारशीत सुधारित जातींची लागवड करावी.
Mung and Cowpea
Mung and CowpeaAgrowon

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अनिल राजगुरू

Indian Agriculture : मूग लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. पाणथळ, क्षारपड, चोपण तसेच उताऱ्यावरील हलक्या जमिनीवर लागवड करू नये. लागवडीपूर्वी शेणखत मिसळावे. मॉन्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी. उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. ७ जुलै नंतर पेरणी करू नये.

पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. पेरणी करताना दोन ओळींत ३० सेंमी आणि दोन रोपांत १० सेंमी ठेवावे. हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन

पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र, ४० किलो स्फुरद द्यावे.

पीक फुलोऱ्यात असताना २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.

शेंगा भरताना २ टक्के डीएपी (२० ग्रॅम डीएपी प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.

आंतरमशागत

पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफशावर करावी. नंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. शक्यतो पेरणीपासून ३० ते ३५ दिवसापर्यंत शेत तणविरहित ठेवावे.

पाणी व्यवस्थापन

फुले येताना आणि शेंगा भरताना पाऊस नसेल आणि जमिनीत ओलावा कमी झाला तर फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळामध्ये हलके पाणी द्यावे आणि दोन टक्के युरियाची फवारणी करावी.

सुधारित जाती

वैभव

कालावधी : ७०-७५ दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम हिरवे दाणे, भुरी रोग प्रतिकारक्षम

उत्पादन : १४-१५ क्विं/हे.

पीकेव्ही, एकेएम-४

कालावधी : ६५-७० दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम आकाराचे दाणे, एकाच वेळी पक्वता, भुरी रोग प्रतिकारक.

उत्पादन ः १०-१२ क्विं/हे.

पीकेव्ही ग्रीन गोल्ड

कालावधी : ७०-७५ दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम आकाराचे दाणे, एकाच वेळी पक्वता, भुरी रोग प्रतिकारक.

उत्पादन : १०-११ क्विं/हे

बी.एम. २००३-२

कालावधी : ६५-७० दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम आकाराचे दाणे, एकाच वेळी पक्वता, भुरी रोग प्रतिकारक.

उत्पादन : १२ -१४ क्विं/हे.

Mung and Cowpea
Agriculture Sowing : पावसामुळे पेरणीला वेग

बी.एम. २००२-१

कालावधी : ६५-७० दिवस

वैशिष्ट्ये : टपोरे दाणे, लांब शेंगा, एकाच वेळी पक्वता, भुरी रोग प्रतिकारक.

उत्पादन : १२ -१४ क्विं/हे.

बीपीएमआर १४५

कालावधी : ६५-७० दिवस

वैशिष्ट्ये : टपोरे, हिरवे दाणे, लांब शेंगा, भुरी रोग प्रतिकारक.

उत्पादन : १२ -१४ क्विं/हे.

उत्कर्ष

कालावधी : ६५-७० दिवस

वैशिष्ट्ये : टपोरे हिरवे दाणे

उत्पादन : १२ -१४ क्विं/हे.

फुले चेतक

कालावधी : ६५-७० दिवस

वैशिष्ट्ये : टपोरे हिरवे दाणे, लांब शेंगा, भुरी रोग प्रतिकारक.

उत्पादन : १२-१५ क्विं/हे.

फुले एम-२

कालावधी : ६०-६५ दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम हिरवे चमकदार दाणे.

उत्पादन : ११-१२ क्विं/हे.

बी एम-४

कालावधी : ६०-६५ दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम हिरवे चमकदार दाणे.

उत्पादन : १०-१२ क्विं/हे.

Mung and Cowpea
Indian Agriculture : पीक बदल, गोपालनातून रोहणवाडीची अर्थकारणाला गती

एस-८

कालावधी : ६०-६५ दिवस

वैशिष्ट्ये : हिरवे चमकदार दाणे.

उत्पादन : ९-१० क्विं/हे.

पीकेव्ही मूग ८८०२

कालावधी : ६०-६५ दिवस

वैशिष्ट्ये : लवकर, एकाच वेळी पक्वता.

उत्पादन : १०-११ क्विं/हे.

फुले सुवर्ण

कालावधी : ६५-७० दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम टपोरे दाणे,भुरी, पिवळा विषाणू रोगास प्रतिकारक, उशिरा पेरणीस योग्य.

उत्पादन ः १०-१२ क्विं/हे.

चवळी लागवड

पावसाच्या पाण्यावर येणारे, आपत्कालीन पीक म्हणून जून, जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर या दरम्यान केव्हाही पेरणी योग्य पावसानंतर चवळी पेरणी करता येते. लागवडीसाठी मध्यम ते भारी,पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन पिकास योग्य असते. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी योग्य पाऊस होताच वाफसा आल्यानंतर पेरणी करावी.

आपत्कालीन पीक म्हणून हे पीक फायदेशीर ठरते. पेरणी ४५ सेंमी बाय १० सेंमी अंतरावर करावी. हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाणास २५ ग्रॅम रायझोबियम आणि पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

पेरणी करताना प्रति हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद किंवा १२५ किलो डीएपी हे खत द्यावे. पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवस तणविरहित ठेवावे.

या पिकास फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू लागते, अशा वेळी पाऊस नसल्यास जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. हे कमी कालावधीचे पीक असल्यामुळे दीर्घ मुदतीच्या पिकात मिश्र पीक किंवा आंतरपीक म्हणून घेणे फायदेशीर ठरते.

सुधारित जाती

कोकण सदाबहार

कालावधी ः ६०-६५ दिवस

वैशिष्ट्ये : लवकर तयार होणारी जात.वर्षभर लागवडीसाठी योग्य,मध्यम आकाराचे दाणे.

उत्पादन : १२-१५ क्विं/हे.

कोकण सफेद

कालावधी : ७०-७५ दिवस

वैशिष्ट्ये : टपोरे सफेद दाणे

उत्पादन : १४-१६ क्विं/हे.

फुले पंढरी

कालावधी : ७०-७५ दिवस

वैशिष्ट्ये : तांबडे,मध्यम दाणे

उत्पादन : १४-१६ क्विं/हे.

फुले विठाई

कालावधी : ७०-७५ दिवस

वैशिष्ट्ये : पांढरा रंग,मध्यम आकाराचे दाणे

उत्पादन : १८-२० क्विं/हे.

फुले रुख्मिणी

कालावधी : ७०-७५ दिवस

वैशिष्ट्ये : पांढऱ्या रंगाचे दाणे

उत्पादन : १२-१४ क्विं/हे.

फुले सोनाली

कालावधी : जिरायती ५५-६० दिवस, बागायती ७०-७५ दिवस

वैशिष्ट्ये ः पांढऱ्या रंगाचे दाणे,एकाच वेळी पक्वता,रोग व किडीस मध्यम प्रतिकारक्षम.

उत्पादन : १४-१८ क्विं/हे.

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९ (एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com