Pulses Cultivation : कुळीथ, मटकीचे लागवडीचे तंत्र

Agriculture Cultivation Technique : कुळीथ (हुलगा) आणि मटकी ही कडधान्य गटातील महत्त्वाची पिके आहेत. कोरडवाहू भागात लागवडीसाठी महत्त्वाचे कडधान्यवर्गीय पीक म्हणून कुळीथ ओळखले जाते.
Agriculture Cultivation Technique
Agriculture Cultivation TechniqueAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : कुळीथ (हुलगा) आणि मटकी ही कडधान्य गटातील महत्त्वाची पिके आहेत. कोरडवाहू भागात लागवडीसाठी महत्त्वाचे कडधान्यवर्गीय पीक म्हणून कुळीथ ओळखले जाते. आंतरपीक म्हणूनही कुळीथ आणि मटकी पिकाची लागवड केली जाते. या दोन्ही कडधान्यवर्गीय पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढते आहे.

Agriculture Cultivation Technique
Pulses Cultivation : माणगावमध्ये कडधान्याच्या शेतीला बहर

जमीन

हलकी, मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन दोन्ही पिकांच्या लागवडीस योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकांची लागवड करणे टाळावे.

पूर्वमशागत

उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.

Agriculture Cultivation Technique
Pulses Cultivation : मुरूड तालुक्यात कडधान्य पेरण्याची लगबग

लागवड

कुळीथ

हे पीक पावसाळी असून काही ठिकाणी १५ जून ते १५ जुलै, तर काही ठिकाणी जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरडवाहू पीक म्हणून पेरणी केली जाते. साधारण साडेतीन ते चार महिन्यांत तयार होते.

बियाणे प्रमाण : हेक्टरी १२ ते १५ किलो.

पेरणी : दोन ओळींत ३० सेंमी व दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवावे.

वाण : फुले सकस, सीना, माण.

मटकी

साधारणतः ६० ते ७० मिमी पाऊस झाल्यानंतर जूनच्या अखेरपर्यंत पेरणी करावी.

पिकाचा कालावधी ३.५ ते ४ महिन्यांचा आहे.

बियाणे प्रमाण : हेक्टरी १२ ते १५ किलो.

पेरणी अंतर : दोन ओळींत ३० सेंमी व दोन रोपांत १० सेंमी अंतर ठेवावे.

वाण : फुले सरिता, एम. बी. एस. २७, मोट नं. ८८

खत व्यवस्थापन

मटकी आणि कुळीथ पिकास १२ ते १५ किलो नत्र आणि २५ ते ३० किलो स्फुरद या प्रमाणे रासायनिक खताची मात्र द्यावी. म्हणजेच ७५ किलो डीएपी खत प्रति हेक्टर प्रमाणे पेरणी करताना द्यावे.

आंतरमशागत

पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. पेरणीनंतर सुरवातीचे ३० ते ३५ दिवस पीक तणविरहीत ठेवावे.

- डॉ. आदिनाथ ताकटे ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com