Pulses Cultivation : मुरूड तालुक्यात कडधान्य पेरण्याची लगबग

यंदा पावसाने ऑक्टोबरअखेर हजेरी लावल्याने निमगरवे व गरवे भाताची कापणी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गेली. अवकाळी पावसामुळे जमिनीत पाणी मुरल्याने मुरूड तालुक्यात कडधान्याची लागवडही हळूहळू केली जात आहे.
Pulses
PulsesAgrowon

मुरूड : यंदा पावसाने ऑक्टोबरअखेर हजेरी लावल्याने निमगरवे व गरवे भाताची कापणी (Paddy Harvesting) नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गेली. अवकाळी पावसामुळे जमिनीत पाणी मुरल्याने मुरूड तालुक्यात कडधान्याची लागवडही (Pulses Cultivation) हळूहळू केली जात आहे. तालुक्यात भातशेती क्षेत्र ३३०० हेक्टर असले, तरी ३२०० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. तसेच वाल, चवळी, मूग, हरबरा (Chana) आदी कडधान्यांची लागवड एकूण १३० हेक्टर जमीन क्षेत्रावर करण्यात आली आहे.

Pulses
Pulse Production : खरिपातील कडधान्य उत्पादन घटणार

तालुक्यात बागायती क्षेत्र सोडले, तर रब्बी हंगामात दुपिकी जमीन क्षेत्र नगण्य म्हणावे लागेल. भातशेतीनंतर कडधान्याची लागवड करताना शेताभोवती कुंपण घालणे खर्चिक बाब झाली आहे. तरीही समुद्र किनार्!यालगतच्या खार जमिनीवर वाल, चवळी, मूग व हरबरा यांसारखे कडधान्य पारंपरिक पद्धतीने घेतले जाते. थंडीच्या मोसमात रात्रीच्या वेळी पडणाऱ्या दवांमुळे कडधान्याला पाणी व पोषक द्रव्ये मिळत असतात.

Pulses
Pulse Production : खरिपातील कडधान्य उत्पादन घटणार

रायगड जिल्ह्यात भातशेती आटोपल्यानंतर गावठी वालाची पेरणी होत असते. अर्थात स्थानिकांसह पर्यटकांना पोपटी पार्टीसाठी गावठी वालांना विशेष मागणी असते. मुरूड तालुक्यात यंदा वालाचे पीक ६५ हेक्टर क्षेत्रावर घेतले आहे. तर चवळी ३० हेक्टर, मूग ३० हेक्टर आणि हरबराची ५ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी दिली.

पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा काढण्याचे प्रमाण ३ टक्के इतके होते; मात्र महसूल विभागाकडून ७० टक्क्यांपेक्षा जास्त आणेवारी असल्याने पीकविम्याची कुठलीही भरपाई मिळण्याची शक्यता नाही. सरकारने भातपिकाला हमी दिल्याने बळीराजाला काही अंशी दिलासा अलिकडे मिळत आहे.

यंदा पोपटी हंगाम उशिरा

यंदा भातकापणी उशिरा झाल्याने कडधान्य पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस झाली आहे. त्यामुळे वालाच्या शेंगा थंडीच्या हंगामात न मिळता उन्हाळ्यात पोपटीसाठी उपलब्ध होणार आहेत. गत वर्षी ओल्या शेंगांचा भाव १०० ते १५० रुपये पायली इतका होता. तर सुके वाल ४०० रुपये पायलीने विकले गेले, अशी माहिती खार अंबोलीचे शेतकरी मनोज कमाने यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com