Natural Farming : नैसर्गिक शेतीत गोकृपामृत पद्धतीद्वारे संत्रापीक नियोजन शक्य

Gokripamrit Method : सध्याच्या परिस्थितीत वातावरण बदल व बाजारपेठेतील कमी दर यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत असून यावर उपाय म्हणजे नैसर्गिक शेतीद्वारे खर्च कमी करून जमिनीचे व बागेचे आरोग्य राखणे हा एकमेव उपाय आहे.
Natural Farming
Natural Farming Agrowon

Washim News : सध्याच्या परिस्थितीत वातावरण बदल व बाजारपेठेतील कमी दर यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत असून यावर उपाय म्हणजे नैसर्गिक शेतीद्वारे खर्च कमी करून जमिनीचे व बागेचे आरोग्य राखणे हा एकमेव उपाय आहे.

यासाठी नैसर्गिक शेतीअंतर्गत गोकृपामृत शेती पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च निम्म्यावर येऊन उत्पन्न व नफा वाढवणे सहज शक्य असल्याचे मत केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केले.

Natural Farming
Natural Farming : नैसर्गीक शेतीत सुक्ष्मजीव महत्वाचे

कृषी विज्ञान केंद्राद्वारे आत्मा पुरस्कृत संत्रा पिकावरील शेतीशाळा मानोरा तालुक्यातील मोजे बेलोरा येथे पार पडली. शेती शाळेच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी मुंगशीराम उपाध्ये होते. मार्गदर्शक म्हणून या वेळी पाटील उपस्थित होते. पहिल्या सत्रात परिसरातील संत्रा बागांची पाहणी करून निरीक्षणे नोंदविण्यात आली.

Natural Farming
Natural Farming : नैसर्गिक शेती मिशन ‘एनजीओ’मार्फत राबविणार

तांत्रिक सत्रात पाटील यांनी येत्या कालावधीत संत्रा बागांमध्ये करावयाच्या नियोजनाबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच सध्या मोठ्या प्रमाणात पाने पिवळी पडून पानगळ होणे या समस्येवर सविस्तर कारणे व उपाय योजनांची माहिती दिली. गोकृपामृत शेती पद्धतीची सविस्तर माहिती देऊन व मार्गदर्शन करून गोकृपामृतचे कल्चर उपलब्ध करून देण्यात आले.

संत्रा शेती शाळेस कृषी सहायिका प्रीती चौरे, संत्रा उत्पादक शेतकरी बल्लू पाटील, गोपाल पाटील, गुलाब पवार, गजानन गोरले, संतोष शर्मा, संतोष राऊत, दीपक पाटील, उग्रेश्वर राठोड, प्रदीप मिसाळ, योगेश गावंडे इत्यादींसह मानोरा तालुक्यातील बहुतांश संत्रा उत्पादक शेतकरी या वेळी उपस्थित होते. गोपाल पाटील यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com