Natural Farming : किर्लोस विज्ञान केंद्राचे ५०० एकरवर नैसर्गिक शेतीचे उद्दीष्ट

Kirlos Science Centre : ‘आनंदी गाव समृद्ध गाव’ प्रकल्प राबविणाऱ्या किर्लोस विज्ञान केंद्राने रब्बी हंगामात ५०० एकर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.
Natural Farming
Natural FarmingAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : ‘आनंदी गाव समृद्ध गाव’ प्रकल्प राबविणाऱ्या किर्लोस विज्ञान केंद्राने रब्बी हंगामात ५०० एकर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिली.

Natural Farming
Natural Farming : हिमाचल प्रदेश सरकार वाढवणार नैसर्गिक शेतीचे क्षेत्र

किर्लोस विज्ञान केंद्राच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून विषमुक्त शेतीचा प्रयोग सर्वत्र राबविला जात आहे. या प्रयोगासाठी आता शासनाकडून विज्ञान केंद्राला २५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना २ हेक्टरसाठी ७ हजार रुपये वार्षिक असे तीन वर्षांसाठी अनुदान दिले जाणार आहे. या महिन्यापासून नैसर्गिक शेतीच्या चळवळीला सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यात या रब्बी हंगामात ५०० एकरवर नैसर्गिक शेतीचे उद्दीष्ट आहे. त्याकरिता तालुक्यात एक किवा दोन फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यात येणार आहेत. शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे ब्रिगेडियर सावंत यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com