Crop Insurance : तांत्रिक अडचणीत शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला, मंत्री दादाजी भुसेंनी घेतला आढावा

Crop Insurance of Farmers : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व पीक विमा योजना बैठकीत पालकमंत्री भुसे बोलत होते.
Crop Insurance
Crop Insuranceagrowon
Published on
Updated on

Crop Insurance Maharashtra : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रास्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या माध्यमातून मिळणारा विम्याचा लाभ पिक विमा कंपनीने तत्काळ वाटप करावा.

जेणे करून शेतकऱ्यांना योग्य वेळेत आर्थिक मदत प्राप्त होईल अशी अंमलबजावणी करावी, अशा सूचना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व पीक विमा योजना बैठकीत पालकमंत्री भुसे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता, त्यांना निकषानुसार लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे.

त्या अनुषंगाने सर्व बँकांनी शाखानिहाय या योजनेचा लाभ आवश्यक त्यासर्व शेतकरी लाभार्थ्यांना होईल यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे.

Crop Insurance
Dada Bhuse : समाजाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे ः भुसे

तसेच लीड बँकेने सर्व बँकांना सूचित करावे की, विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व इतर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही इतर कोणत्याही कारणास्तव वळती करू नये. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जिल्ह्यातील साधारण ५ लाख ८८ हजार ६४८ शेतकरी सहभागी झाले असून यातील आतापर्यंत पिक विमा कंपनीने ५७ कोटी ४६ लाखंची विमा रक्कम वाटप केली आहे.

यातील उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर विमा रकमेचे वाटप करण्यात यावे. तसेच सोयाबीन, मका व बाजरी या पिकांसोबतच कापूस पिकाचा समावेश करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील पिक विमा योजनेचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असेही पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com