Cow Milk Subsidy
Cow Milk Subsidyagrowon

Milk Subsidy : दूध अनुदानामुळे कोल्हापूरला पावणेअठरा कोटींचा लाभ

Milk Rate : गोकुळकडे दिवसाला ८ लाख लिटर, तर वारणा संघाकडे साडेतीन लाख लिटर गायीचे दूध संकलित होत आहे.
Published on

Kolhapur News : राज्य शासनाकडून गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदानामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ, वारणा दूध संघांच्या दूध उत्पादकांना महिन्याला १७ कोटी ७५ लाख रुपयांचा फायदा होणार आहे.

गोकुळकडे दिवसाला ८ लाख लिटर, तर वारणा संघाकडे साडेतीन लाख लिटर गायीचे दूध संकलित होत आहे. एक जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत संकलित दुधाच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे.

गाय दूध दर अचानक कोसळल्याने राज्यात उत्पादकांनी आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, सरकारने गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.

जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाकडून दिवसाला आठ लाख लिटर दूध आणि वारणा दूध संघाकडून प्रतिदिन तीन लाख ५० हजार लिटर गाय दूध संकलित होते. याला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे उत्पादकांना दिवसाला ४० लाख, दहा दिवसांना चार कोटी आणि महिन्याकाठी १२ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

Cow Milk Subsidy
Milk Subsidy : दुधाच्या अनुदानावरून किसान सभेची सरकारवर टीका

राज्यातील दूध संघांसह गोकुळ आणि वारणाने गाय दुधाचे दर कमी केले होते. यामुळे जिल्ह्यात विविध पक्ष, संघटनांनी आंदोलने केली. रास्ता रोको करून शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्‍न ऐरणीवर आणला. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे गाय दूध दर कमी झाल्याने दुभती जनावरे विकण्याची वेळ आली होती. शासनाने दोन महिन्यांसाठी दिलासा दिला. याचा सर्वाधिक लाभ जिल्ह्यातील उत्पादकांना होणार आहे.

Cow Milk Subsidy
Cow Milk Subsidy : गायीच्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान

...असे मिळणार अनुदान

गाय दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान

पहिल्या टप्प्यात १ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत लागू

दूध संस्थांनी ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफच्या दुधासाठी प्रतिलिटर किमान २९ रुपये दर देणे बंधनकारक

शासनाचे अनुदान थेट बँक खात्यावर जमा होणार

हा मुद्दा अडचणीचा

राज्य शासनाने शेतकऱ्यांचे बँक खाते आधारकार्ड आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्‍यक केले आहे. ज्यांनी अशी कार्ड लिंक केली आहेत, त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होण्यास अडचण येणार नाही; मात्र, ज्यांच्याकडे पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक नाही, अशा शेतकऱ्यांसाठी हा मुद्दा अडचणीचा ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com