Jalgaon News : शासकीय स्वस्त धान्य योजनेच्या लाभार्थींचे ई-केवायसी करण्याचे निर्देश आहेत. परंतु सर्व्हर डाउन असल्याने हे ई-केवायसी करताना अडचणी येत असल्याची स्थिती आहे.
३० सप्टेंबरअखेरपर्यंत हे ई-केवायसी रेशन लाभार्थींना करायचे आहे. पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दिले जाते. पिवळे रेशनकार्डधारकांसह केशरी शिधापत्रिकाधारकांना हे केवायसी करून घ्यायचे आहे. परंतु याबाबत कुठेही गतीने काम रेशन दुकानदार करीत नसल्याची स्थिती आहे.
यामुळे लाभार्थी संभ्रमात आहेत. कारण अनेकांची ई-केवायसी सर्व्हर डाउनच्या समस्येने झालेली नाही. यात रेशन दुकान सकाळी सुरू तर दुपारी बंद असते. काही दुकाने फक्त धान्य वाटपासाठी सुरू असतात. यामुळे लाभार्थींना रोज या रेशन दुकानात चकरा माराव्या लागत आहेत. ही ई-केवायसी सीएससी केंद्र किंवा बँकेत होत नसल्याने अधिकची अडचण आहे.
ही केवायसी करताना लाभार्थींच्या बोटांचे ठसे हवे असतात. यामुळे संबंधित लाभार्थींना रेशन दुकानात जावे लागत आहे. परंतु सर्व्हर डाउनमुळे हे काम ठप्प आहे. यात लाभार्थींचा वेळ व खर्च वाया जात आहे. कारण अनेक जण गावाबाहेर खासगी नोकरी, कामानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत. खानदेशात सुमारे आठ लाखांपेक्षा अधिक रेशनचे लाभार्थी आहेत. यातील अनेकांची केवायसी तांत्रिक व अन्य अडचणींमुळे पूर्ण झालेली नाही.
सर्व्हर डाउन असल्याने हे केवायसी केव्हा पूर्ण होईल, असाही प्रश्न आहे. यामुळे या कामास मुदतवाढ देण्याचीही तयारी पुढे शासनाने ठेवावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.