Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंर्तग चौथा हफ्ता शेतकऱ्यांना वितरीत

Agricultural festival in Parli : परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हफ्ता बुधवारी वितरीत आला आहे.
Namo Shetkari Sanman
Namo Shetkari Sanmanagrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील बहुप्रतिक्षीत राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हफ्ता बुधवारी (ता. २१) वितरीत करण्यात आला. परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत योजनेचा चौथा हफ्ता थेट वर्ग करण्यात आला आहे. या योजनेतून राज्यातील सुमारे ९१ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून तब्बल १८८८ कोटी रूपये शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहेत.

यावेळी यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अतुल सावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.पंकजा मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधींसह कृषी विभागाच्या अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

Namo Shetkari Sanman
Namo Shetkari Mahasanman Yojana : नमो शेतकरी महासन्मान योजनेंर्तग ८६ लाख शेतकऱ्यांना १७२० कोटींचे उद्या होणार वितरण

बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. तर हे कृषी महोत्सव बुधवार पासून २५ ऑगस्टपर्यंत पाच दिवस चालणार आहे. यावेळी राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हफ्त्याचे वितरिण करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्री मुंडे यांनी दिली होती. त्याप्रमाणे बुधवारी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९० लाख ८८ हजार ५५६ शेतकऱ्यांना या योजनेच्या चौथा हफ्त्याचे वितरिण करण्यात आले आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथ्या हफ्त्यापोटी १८८८ कोटी ३० लाख २६ हजार रूपये राज्य सरकारने वर्ग केले आहेत.

दरम्यान याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात आले.

Namo Shetkari Sanman
Namo Mahasanman Nidhi : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी| ॲग्रोवन

तर मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अर्थसंकल्पात जाहीर केली होती. पीएम किसानच्या धर्तीवर ही योजना राबविण्याची घोषणा करून प्रतिवर्षी शेतकऱ्याला ६००० रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मागील वर्षी तीन तर यंदा चौथा हप्ता देण्यात आला आहे.

नमो शेतकरी महासन्मानच्या तिसऱ्या हप्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दोन हप्त्यांचा लाभ मिळेल, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पीएम किसानच्या १७ व्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील ९१ लाख ४४ हजार ४४७ शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी ९० लाख ८८ हजार ४२ शेतकऱ्यांना हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे तेवढ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे वाटप होईल असे सांगण्यात येत होते. पण आता राज्यातील ९० लाख ८८ हजार ५५६ शेतकऱ्यांना नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्त्याचा लाभ मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com