Electricity Bills : वीजबिलात १६ टक्के शुल्काचा भुर्दंड

16% Power Tariff Surcharge : महावितरणकडून दर महिन्याला येणारे वीजबिल म्हणजे सामान्य घरगुती ग्राहकांसाठी खर्चाची एक मोठी रक्कम शिल्लक ठेवण्यासारखे झाले आहे.
Electricity Bills
Electricity BillsAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : महावितरणकडून दर महिन्याला येणारे वीजबिल म्हणजे सामान्य घरगुती ग्राहकांसाठी खर्चाची एक मोठी रक्कम शिल्लक ठेवण्यासारखे झाले आहे. त्यामुळे आर्थिक बजेट बिघडत चालले असून, बिलात वसूल करण्यात येणारे १६ टक्के वीज शुल्क थेट सरकारी तिजोरीत जमा होत आहे.

युनिटनुसार वापरलेले बिल ग्राहकांना वीज आकारात मिळते. त्यानंतर स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार बिलात आकारला जातो. या चारही आकार मिळून प्रत्येक बिलात १६ टक्के वीज शुल्क ग्राहकांकडून वसुल केले जाते. त्यामुळे आधीच दोन वर्षांसाठी वीज दरवाढ केल्याने येणाऱ्या भरमसाट बिलावर ग्राहकांना वीज शुल्कही द्यावे लागत असल्याने बिलाचे आकडे आणखी फुगले आहे.

Electricity Bills
Electricity Bill : पंचवीस हजार शाळांच्या वीजबिलासाठी अकरा कोटी

सरकार प्रत्येक ग्राहकांच्या बिलातून १६ टक्के वीज शुल्क आकारत आहे. हा पैसे थेट सरकारी तिजोरीत जमा होत आहे. त्यामुळे महावितरणसोबतच सरकारकडून दिलासा मिळत नसल्याने सामान्य ग्राहकांमध्ये संताप आहे.

१२१० बिलांवर १६५ रुपये वीज शुल्क

विजेचा वापर कमी असतानाही सामान्य ग्राहकांना भरमसाट बिल येत असल्याच्या तक्रारी आहेत. एका सामान्य घरगुती ग्राहकांकडे १२१० रुपये बिल आले. त्यावर १६ टक्के वीज शुल्क आकारल्याने १६५ रुपये ही अतिरिक्त रक्कम वाढली. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीजबिलात असलेले स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार आणि इंधन समायोजन आकार या चारही आकारांवर १६ टक्के वीज शुल्क आकारल्या जातो. हा एक प्रकारे कर असून, तो महावितरण वगळता सरकारी तिजोरीत जमा होतो.

Electricity Bills
Online Electricity Bills : घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढला कल

दरवाढीसोबतच युनिटचे दरही व्हावे कमी

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दोन वर्षांसाठी मंजूर केलेली दरवाढ १ एप्रिल २०२४ पासून लागू झाली. आयोगाने मागील वर्षी महावितरणच्या वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. ही दरवाढ आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांकरिता आहे. त्यामुळे वीज आणखी महाग झाली आहे.

त्याचबरोबर ० ते १०० युनिटवर ४.७१ रुपये प्रति युनिट, तर १०० ते ३०० युनिटपर्यंत १०.२९ रुपये प्रति युनिट असे वाढते पैसे आकारल्या जात आहे. वाढलेल्या भरमसाट बिलाने वीज दरवाढ मागे घेण्यासोबतच प्रति युनिट दरही कमी करावे, अशी मागणी सामान्य वीज ग्राहकांकडून होऊ लागली आहे.

वीजबिलात १६ टक्के वीज शुल्क आकारले जाणे योग्य नाही. आधीच सामान्य घरगुती ग्राहकांना विजेचे बिल जास्त येत असल्याने नाराजीचा आहे. त्यात शुल्काचा आणखी जास्त फटका बसतो आहे. सरकारने हा शुल्क कमी करून सामान्यांना दिलासा द्यावा.
डॉ. नितीन राऊत, आमदार व माजी ऊर्जामंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com