
Chh. Sambhajinagar News : महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरबसल्या वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. दर महिन्याला ४ लाखांहून अधिक ग्राहक वीजबिल ऑनलाइन भरण्यास पसंती देत आहेत.
त्यामुळे ग्राहकांचे बिल भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहेत. शिवाय असा वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना ०.२५ टक्का सवलतही मिळत, असल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली.
महावितरणच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर परिमंडलात नोव्हेंबर महिन्यात ४ लाख २० हजार ३ ग्राहकांनी १६१ कोटी ३९ लाख रुपयांची वीजबिले ऑनलाइन भरली आहेत. महावितरणच्यावतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने कितीही रकमेचे वीजबिल ऑनलाइन भरता येते.
क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने वीजबिल भरण्यास कसलेही शुल्क लागत नाही. तसेच ऑनलाइन पेमेंटला बिलाच्या रकमेच्या ०.२५ टक्का इतकी सवलतही देण्यात आलेली आहे.
तत्काळ पोहोच व भरणा तपशील
वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे त्वरित पोहोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाइटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते.
‘गो-ग्रीन’द्वारे वर्षाला १२० रुपये वाचवा
महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाइन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी ‘गो-ग्रीन’ योजनेत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा १० रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या वेबसाइटवर उपलब्ध असल्याचे महावितरणने कळविले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.