
Yavatmal News : वीजबिल थकल्याने महावितरणकडून तब्बल २५ हजारांवर शाळांचा गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठाच कापण्यात आला आहे. वारंवार ओरड झाल्यानंतर अखेर राज्य शासनाने या शाळांसाठी ११ कोटी ११ लाख रुपयांचा निधी शिक्षण आयुक्तांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे या शाळांचा ‘वीज’नवास संपणार आहे.
खेड्यापाड्यातील ६५ हजारांवर शाळांमध्ये वीजपुरवठ्याची मोठी समस्या आहे. विशेषतः १९ जिल्ह्यांमधील शाळांची थकबाकी प्रचंड वाढल्याने महावितरणने थेट शिक्षण संचालनालयाला जानेवारीतच सूचना दिली होती. त्यानंतर संचालनालयाने सर्व जिल्ह्यांकडून थकबाकीदार शाळांचा अहवाल गोळा करून महावितरणला आणि शासनाला दिला.
आता राज्य शासनाने हे बिल चुकते करण्यासाठी ११ कोटी ११ लाख रुपये शिक्षण आयुक्तांकडे सुपूर्द करण्यास मंजुरी दिली. त्यातून १६ जिल्ह्यांतील शाळांचे जुलैपर्यंतचे वीजबिल महावितरणकडे भरले जाणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
‘त्या’ तीन जिल्ह्यांचा प्रश्न कायमच
वीज कापलेल्या २५ हजार १५७ शाळांचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महावितरणला २९ जुलै रोजी सादर केला. त्यातील १६ जिल्ह्यांचीच माहिती योग्य होती. तर छत्रपती संभाजीनगर, सांगली आणि परभणी जिल्ह्यांतील शाळांची माहिती मिळाली नसल्याचे महावितरणने २३ ऑगस्ट रोजी शिक्षण विभागाला कळविले. त्यामुळे शासन स्तरावरून १६ जिल्ह्यांसाठीच निधी आला.
पाच हजार शाळांचे मीटर काढले
जिल्हा परिषद शाळांचे वीजबिल थकल्याने महावितरणकडून कठोर कारवाई करण्यात आली. यात २० हजार २१८ शाळांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. तर ४ हजार ९३९ शाळांमधील वीज मीटरच काढून घेण्यात आले. आता शासन स्तरावरून बिलाचा भरणा होत असल्याने हे मीटर तातडीने बसवून देण्याची मागणी होत आहे.
जिल्हा थकित शाळा एकूण थकबाकी
यवतमाळ २०४० १ कोटी ७ लाख
वर्धा ९२१ २२ लाख
नागपूर १४८७ ४७ लाख
चंद्रपूर १५१३ ३१ लाख
वाशीम ७०२ ३७ लाख
बुलडाणा १३६९ ७९ लाख
अहिल्यानगर ३१६४ १ कोटी ३ लाख
बीड १४६३ १ कोटी ८९ लाख
रायगड २३७७ १ कोटी १७ लाख
सिंधुदुर्ग १३४९ २८ लाख
रत्नागिरी २३८४ ३४ लाख
पालघर १८२६ ७९ लाख
जळगाव २०२६ ६२ लाख
धुळे ७८२ २४ लाख
नंदूरबार ७०१ २९ लाख
धाराशिव १०५३ ९६ लाख
एकूण २५,१५७ ११ कोटी ११लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.