Achalpur APMC Scam: अचलपूर समितीत कोट्यवधीचा बांधकाम घोटाळा

Administrator Fraud: संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर कामकाज पाहणाऱ्या प्रशासकानेच कर्मचाऱ्यांशी संगनमत करीत कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार केल्याचा आरोप आहे
Achalpur APMC
Achalpur APMCAgrowon
Published on
Updated on

Amravati News: संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर कामकाज पाहणाऱ्या प्रशासकानेच कर्मचाऱ्यांशी संगनमत करीत कोट्यवधी रुपयांचा गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. अचलपूर बाजार समितीअंतर्गत घडलेल्या या प्रकाराचा अंकेक्षण (ऑडीट) अहवालानंतर खुलासा झाला. त्यामुळे या प्रकरणात फौजदारी कारवाईच्या हालचाली सुरू आहेत.

अचलपूर बाजार समितीअंतर्गत तत्कालीन संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर २०२२-२३ या वर्षात प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली. सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे प्रशासकाची जबाबदारी होती. त्यांनी तत्कालीन सचिव अमर वानखडे, लेखापाल गुडदे यांच्याशी संगनमत करीत १ कोटी ३५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

Achalpur APMC
Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

अचलपूर बाजार समितीअंतर्गत हा इतिहासातील सर्वांत मोठा अपहार असल्याचे सांगितले जाते. प्रशासक काळात २०२३ मध्ये बाजार समिती परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम करण्यात आले होते. ही कामे करणाऱ्या कंत्राटदाराला नियमबाह्यपणे देयके अदा करण्यात आली. बांधकाम कंत्राटदाराला काम सुरू असताना (रनिंग) देयके देण्यापूर्वी आर्किटेक्‍टची (वास्तुविशारद) शिफारस घ्यावी लागते.

परंतु ती न घेताच कंत्राटदाराला देयके अदा करण्यात आली. या माध्यमातून १ कोटी ३५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. प्रशासकाला कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. या बाबीकडेदेखील दुर्लक्ष करीत नियमबाह्य कामे करण्यात आली, असेही सांगण्यात आले. कंत्राटदाराला अदा केलेल्या देयकांसमवेत इतर कामांसाठी पैसा खर्ची घालण्यात आला. त्याकरिता व्हाऊचरचा उपयोग केला गेला. जिल्हा विशेष लेखा परीक्षक (सहकारी संस्था) जे. आर. गवळे यांनी हे लेखा परीक्षण केले.

Achalpur APMC
Solapur APMC : सोलापूर बाजार समितीत ११ नव्या पिकांचे नियमन

अंकेक्षण अहवालात खुलासा

प्रशासकाच्या काळात अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर नवनियुक्‍त संचालक मंडळाने अंकेक्षण करण्याचा निर्णय घेतला. अंकेक्षण अहवाल प्राप्त होताच अपहारासंबंधीत खुलासे झाले. त्याआधारे आता संबंधितांना रितसर नोटीस बजावत कारवाई केली जाणार असल्याचे प्रभारी सचिव योगेश चव्हाण यांनी सांगितले.

तत्कालीन सचिव अमर वानखडे, लेखापाल गुडदे यांच्यासह तत्कालीन प्रशासक यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा खुलासा अंकेक्षण अहवालात झाला आहे. त्यामुळे नोटीस बजावत फौजदारी कारवाई प्रस्तावित आहे.
प्रतीभा प्रशांत ठाकरे, सभापती, बाजार समिती, अचलपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com