Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द
Chhatrapati Sambhajinagar News: एकीकडे ‘सहकारातून समृद्धी’ या उक्तीनुसार आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे केले जात असतानाच दुसरीकडे ‘सहकारा’चीच फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विभागाने हा प्रयत्न हाणून पाडला असून, एकाच घरातील सदस्यांची नावे असलेली तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे नावनोंदणी केली असल्याचे समोर आले आहे. गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील १५ गावांतील ४२ संस्थांची नोंदणी विभागीय सहनिबंधकांनी रद्द केली आहे.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, अकोली येथील संचालक वामन सखाराम पोले यांनी सहकार विभागाकडे धाव घेतली होती. त्यानुसार जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहभाग घेता यावा या उद्देशाने २०११ मध्ये अनेक सेवा संस्थांची नोंदणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
संस्था नोंदणीदरम्यान एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची जसे की पत्नी संस्थेची चेअरमन तर पती दुसऱ्या संस्थेचे चेअरमन, तसेच आई-वडीलही तिसऱ्या संस्थेचे चेअरमन अशा संस्थांची नोंदणी केली होती. एका कुटुंबातील सदस्य नसावेत ही अट असताना अनेक संस्थांनी ‘आम्ही विभक्त कुटुंबांतील सदस्य आहोत ’ असे खोटे शपथपत्र दिले.
संस्था नोंदणी केलेल्या गावांमध्ये गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी, अंतरवेली, पिसेवाडी (३ संस्था), उखळी, कड्याची वाडी, कातकरवाडी, पोखर्णी तांडा, पिंपळदरी (३), पोखर्णी वा. (२), बडवणी (३), गंगाखेड (३), वागदरी (५), तांदळवाडी (४), गोदावरी तांडा, सेलमोहा, वागदेवाडी, वागदरा, बोर्डा, डोंगरगाव, आनंदनगर, सिरसम, मुळी, कोद्री (३ संस्था), बनपिंपळा या गावांचा समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.