Congress Protest: मतचोरीवरून काँग्रेसचे आंदोलन

Vote Rigging Allegations: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने मतचोरी केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने शुक्रवारी (ता. ७) दादर येथे चक्का जाम आंदोलन करत निदर्शने केली.
Dadar Protest
Dadar ProtestAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपने मतचोरी केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने शुक्रवारी (ता. ७) दादर येथे चक्का जाम आंदोलन करत निदर्शने केली. या वेळी निवडणूक आयोग व भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तासभर चक्का जाम करण्यात आला.

या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजन भोसले, किशोर कन्हेरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ यांच्यासह आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला.

Dadar Protest
Congress Protest: मुंबईत काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधात संताप! टिळक भवनाबाहेर रास्ता रोको

या वेळी पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी अत्यंत तर्कसंगत मांडणी करून मतदानातील मोठा घोटाळा उघड केला, लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कसे सुरू आहे, हे दाखवून दिले. निवडणुकीतील हा घोटाळा स्पष्ट दिसत असल्याने सरकारने राजधर्म पाळत एखादी एसआयटी स्थापन करायला हवी होती अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे होती.

पण राहुल गांधी यांनी पुरावे देत तथ्य मांडूनही ना केंद्र सरकारने चौकशी करण्याची धमक दाखवली ना निवडणूक आयोगाने काही खुलासा केला, उलट राहुल गांधी यांनाच प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले, हा आणखी हास्यास्पद प्रकार आहे.’’

Dadar Protest
Farmer Protest: शेतीपिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

श्री. सपकाळ म्हणाले, की निवडणूक आयोगाच्या १९६० च्या नियमावलीनुसार, जर अशा प्रकारे कोणी हरकत घेतली वा आक्षेप नोंदवला तर नियम १७/१८/१९ नुसार ताबडतोब चौकशी करावी, असे कायदाच सांगत आहे, मग चौकशी का केली जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस ‘चिप मिनिस्टर’

निवडणूक आयोगाची पोलखोल केल्यानंतर भाजप हे राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली त्यातून ते निवडणूक आयोगाचे दलाल आहेत, वकील आहेत की प्रवक्ते असा प्रश्‍न पडतो. फडणवीस यांच्यात अहंकार दडलेला आहे. या अहंकाराचा दर्प नाही तर दुर्गंधी त्यांच्या बोलण्यातून दिसली. हे ‘चीफ मिनिस्टर’ नाही तर ‘चिप मिनिस्टर’ आहेत. जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोलले जाते तेव्हा तेव्हा भाजप व देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते, असा सवाल सपकाळ यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com