Phule Wada: फुले वाडा भूसंपादनाची कामे गतीने पूर्ण करा: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरण’ म्हणून आरक्षित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तारीकरणाकरिता आरक्षित क्षेत्राच्या भूसंपादनाचे काम गतीने पूर्ण करावे.
Savitribai Phule Memorial
Savitribai Phule MemorialAgrowon
Published on
Updated on

Pune News: ‘‘महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरण’ म्हणून आरक्षित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तारीकरणाकरिता आरक्षित क्षेत्राच्या भूसंपादनाचे काम गतीने पूर्ण करावे,’’ अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या

भिडेवाडा, महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाबाबत गुरुवारी (ता. २४) माहिती घेतली त्यावेळी श्री. भुजबळ बोलत होते. या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, उपायुक्त अविनाश संकपाळ, सहायक आयुक्त किसन दगडखैर, भूसंपादन उपायुक्त वसुंधरा बारवे, अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, अधीक्षक अभियंता राजेश बनकर आदी उपस्थित होते.

Savitribai Phule Memorial
Crop Compensation : ३४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी, गारपीटसाठी अनुदान मंजूर; राज्य सरकारचा निर्णय

श्री. भुजबळ म्हणाले, की महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राचे पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Savitribai Phule Memorial
Fake Agriculture Commissioner: तोतया कृषी आयुक्त आढळल्याने खळबळ

स्मारकाचे कामे करताना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केलेल्या सूचनांचा विचार करावा, असेही श्री. भुजबळ म्हणाले.प्रारंभी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाची पाहणी तसेच याठिकाणी बसविण्यात येणाऱ्या खिडक्यांबाबत माहिती घेऊन स्मारकाची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या श्री. भुजबळ यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

श्री. चंद्रन म्हणाले, की महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणाकरिता महानगरपालिकेने स्मारकालगतच्या आरक्षित क्षेत्राअंतर्गत ११९ घरांत (सिटी सर्व्हे क्रमांक), ६२४ मालक, ३५८ भाडेकरू, गलिच्छ वस्ती निर्मूलनाअंतर्गत ३६ गाळ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, भूसंपादनाचे काम गतीने पूर्ण करण्यात येईल, असेही श्री.चंद्रन म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com