Chhagan Bhujbal oath : छगन भुजबळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; आता नाशिक जिल्ह्यात चार मंत्री

Mahayuti Oath Taking : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी (ता.२०) राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सकाळी १० वाजता राजभवनात भुजबळ यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
Chhagan Bhujbal oath
Chhagan Bhujbal oath Agrowon
Published on
Updated on

NCP Minister : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी (ता.२०) राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सकाळी १० वाजता राजभवनात भुजबळ यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यामुळे भुजबळ यांची नाराजीवर दूर करण्यात आली आहे.

अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अलीकडेच राजीनामा दिला. त्यामुळे मुंडे यांच्या मंत्रीपदावर भुजबळ यांची वर्णी लागली आहे. परंतु भुजबळ यांना कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात आली ते अजून गुलदस्त्यात आहे. मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी भुजबळांकडे देण्यात येईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

Chhagan Bhujbal oath
अन्नछत्र चालविणाऱ्या संस्थांना अल्पदरात अन्न धान्य : भुजबळ

भुजबळ यांनी मात्र मुख्यमंत्री जे खातं देतील ते आपण स्वीकारू अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये भुजबळ यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु महायुतीनं भुजबळांचा पत्ता कट केला होता.

नाराज भुजबळांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील नेत्यांवर कठोर टीका केली होती. भुजबळांची नाराजी लपून राहिलेली नव्हती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत संयम बाळगण्याचा सल्ला फडणवीसांनी भुजबळांना दिला होता.

नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत ओबीसी मतदार महायुतीकडे खेचला जावा, यासाठी भुजबळांचा चेहरा महत्त्वाचा आहे. मंत्रिमंडळातील ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु मुंडे यांनी राजीनामा दिल्याने आता भुजबळांची मंत्रिमंडळातील ओबीसी चेहरा करण्याची महायुतीनं खेळी खेळल्याचं बोललं जात आहे.

Chhagan Bhujbal oath
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ देणार नाहीः छगन भुजबळ

दरम्यान, छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रिपद आल्यामुळे नाशिक जिल्ह्यात आता चार मंत्रीपद आली आहेत. यामध्ये दादा भुसे (शालेय शिक्षण) नरहरी झिरवळ (अन्न आणि औषध) माणिकराव कोकाटे (कृषी) खाती आहेत. आता छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com