MGNREGA Fund : ‘मनरेगा’च्या अंमलबजावणीत निधी उपलब्धतेचा अडसर

MGNREGA Fund Crisis : मागेल त्याला काम या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला (मनरेगा) निधी टंचाईच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
MGNREGA
MGNREGAAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : मागेल त्याला काम या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला (मनरेगा) निधी टंचाईच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

राज्यात मनरेगाअंतर्गत कुशल, अकुशल कामगारांचे तब्बल २२३० कोटी थकित आहेत. परिणामी, कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, योजनेच्या अंमलबजावणीवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मनरेगाअंतर्गत गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक अशी दोन्ही प्रकारची कामे केली जातात. आवास योजना, गोठ्याचे बांधकाम, फळबाग लागवड, वृक्षारोपण, विहीर बांधकाम, नाडेप डेपो, पाणंद रस्ते, शोषखड्डे यांसह २६६ प्रकारची कामे योजनेत समाविष्ट आहेत.

MGNREGA
MGNREGA : मनरेगा अंतर्गत २३३ कोटी ९९ लाख रुपयांवर खर्च

निधीचे वितरण कुशल (साहित्य) आणि अकुशल (मजुरी) अशा दोन भागांत केले जाते. अकुशल मजुरी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते, तर कुशल निधी काम पूर्ण झाल्यावर दिला जातो. २०१५ ते २०२४-२५ या कालावधीत राज्यात मनरेगाअंतर्गत झालेल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांसाठी कुशल निधीपैकी सुमारे ३६०९ कोटी रुपये थकित होते.

जिल्हा यंत्रणेने मनरेगा आयुक्तांकडे वारंवार मागणी करूनही १०० टक्के निधी उपलब्ध झाला नाही. सततच्या पत्रव्यवहारानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून काही निधी मंजूर झाला, पण तो मागणीच्या तुलनेत अत्यल्प आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केवळ ३८ टक्के निधी प्राप्त

गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत मनरेगाचा तब्बल ३६०९ कोटी रुपयांचा निधी थकित आहे. नागपूर येथील मनरेगा आयुक्‍तालयाकडून या संदर्भात वारंवार शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला.

MGNREGA
MGNREGA Scam : मजुरांच्या खात्यात पैसे टाकणारे चौघे अटकेत

त्याची दखल घेत १३७९ कोटी ४५ लाख २५ हजार रुपये मंजूर करण्यात आले. यात केंद्राचा १०३४ कोटी ५८ लाख, तर राज्याचा ३४४ कोटी ८६ लाख इतका वाटा आहे. थकितच्या तुलनेत केवळ ३८ टक्‍के निधीची उपलब्धता केली गेली. परिणामी, सद्यःस्थितीत सुमारे २२३० कोटी २८ लाख ९७ हजार रुपये थकित आहेत. ज्यामध्ये केंद्राचा ७५ आणि राज्याचा २५ टक्‍के हिस्सा आहे.

राज्याला नुकताच केंद्र आणि राज्याच्या हिश्‍श्‍याचा १ हजार ३७९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून २०१५ ते २०२४-२५ पर्यंतच्या कामांची देयके वितरित करण्यात येतील. या आठवड्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांना हा निधी वितरित करण्यात येईल. यानंतर येणाऱ्या निधीतून शिल्लक वर्षातील कामांची देयके अदा करण्याला प्राधान्य राहणार आहे.
- डॉ. भरत बास्टेवाड, मनरेगा आयुक्त महाराष्ट्र
मागेल त्याला गावातच रोजगार उपलब्धतेचा पर्याय मनरेगातून उपलब्ध होतो. यामुळे शेतीकामे नसलेल्या काळात मजुरांचे स्थलांतर थांबण्यास मदत होते. परंतु केंद्र व राज्य सरकारस्तरावर निधी उपलब्ध होत नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या श्रमाचे मोल जाणत शासनाने श्रमिकांसाठीच्या योजनांकरिता निधी उपलब्धतेत कुचराई करू नये.
- जगदीश नरवाडे, अध्यक्ष, जनआंदोलन आधार संघर्ष समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com