Agrowon Agriculture Exhibition : पूरक, प्रक्रिया उद्योगासह नवतंत्रज्ञानाने वेधले लक्ष

Agriculture Exhibition : सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला राज्यभरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.११) पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद दिला.
Agriculture Exhibition 2024
Agriculture Exhibition 2024Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला राज्यभरातील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता.११) पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद दिला. शेतीतले नवनवीन तंत्रज्ञान, कीड-रोगांवरील उपाय, शेतीपूरक व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योगासह यांत्रिकीकरणाची विविध दालने विशेष आकर्षण राहिले.

प्रदर्शनात पशुपालन, ड्रीप, सोलर, शेतीसंबंधीची उपयोगी माहिती मिळाली. फळबागा व अस्तरीकरण व इतर बाबींविषयी ज्ञानात भर पडली. विविध तज्ज्ञांची भेट शेती व्यवस्थापनासाठी मोलाची ठरणारी आहे.

- सुभाष भगवान सोनवणे, साष्ट पिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना

शेती करताना पाणी व्यवस्थापन व इतर कमी खर्चीक बाबींची माहिती हवी असते. ही माहिती प्रदर्शनातून मिळाली. हे प्रदर्शन शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे आहे.

- राजू गोविंद हूड, पाडळी, ता.पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

मी पारंपरिक पद्धतीने शेती करत असून, नवे काही तरी करण्याची ओढ आहे. प्रदर्शनामध्ये तुती लागवडीविषयी मार्गदर्शन मिळाले. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटल्याने तुती लागवड करणार आहे.

-जुबेर शेख, अलापूरवाडी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

शेतीला पूरक व इतर बाबींचा आधार हवा आहे. पूरक व्यवसाय कसा करावा, फळबागांचे काटेकोर व्यवस्थापन कसे करावे याची नेमकी माहिती प्रदर्शनात मिळाली. तसेच ड्रीपमधील वेगवेगळे तंत्र, त्याचा वापर, पाण्याची उपलब्धता व त्यानुसार सिंचन प्रणाली याबाबतही विविध माहिती मिळाली.

-कैलास शिवाजी हांडे, अंतरवाली खांडी, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

Agriculture Exhibition 2024
Agriculture Exhibition : आधुनिक कृषी तंत्रज्ञानासाठी कृषी प्रदर्शनाचे व्यासपीठ उपयुक्त

कृषी क्षेत्रात कामाची काय संधी आहे, त्यात काय नवे पैलू येत आहेत याबाबतची माहिती प्रदर्शनातून मिळाली. हे प्रदर्शन शेतकऱ्यांना नवी दिशा देणारे ठरेल.

-बाबासाहेब मालोदे, दरेगाव दरी, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर

आमची बागायती शेती असून, त्यात काय सुधारणा हवी, खते व पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबतची सोपी व नेमकी माहिती मिळाली. प्रभावी सिंचन तंत्रज्ञानातून प्रगती साध्य करण्याची ऊर्जा मिळाली.

-सोनाली युवराज बोंगाणे, लायगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर

मी मुंबईत जीएसटी विभागात असून गावी पाचोरा (जि.जळगाव) येथे आधुनिक पद्धतीने शेती देखील कसतो. येत्या काळात कृषी पर्यटन करण्याचे प्रस्तावित आहे. ॲग्रोवन युवा शेतकऱ्यांचा वाटाड्या आहे. नवे तंत्रज्ञानाची माहिती कृषी प्रदर्शनातून मिळाली.

-शशिकांत गुजेला, पाचोरा, जि. जळगाव

मी कपाशी, आले पिकांचे उत्पादन घेतो. दुग्ध व्यवसायही आहे. आमच्या कुटुंबातील सदस्य दरवर्षी ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनास आवर्जून भेट देतात. यंदाच्या कृषी प्रदर्शनात पशुखाद्य, आहार व्यवस्थापनाबाबत मिळाली.

-मश्चिंद्र मालोदे, दरेगाव दरी, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर

Agriculture Exhibition 2024
Agriculture Exhibition : ‘अॅग्रोटेक’मध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचे सादरीकरण

मी ॲग्रोवनचा नियमित वाचक आहे. आज खास ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलो आहे. गतवर्षी देखील ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनास भेट दिली होती. यंदाच्या प्रदर्शनात नवनवीन कृषी अवजारांची माहिती मिळाली. त्यामुळे मजुरांच्या समस्येवर मात करता येईल.

- संपतराव पाटील, मनूर, ता. माजलगाव, जि. बीड

मी आठ वर्षांपासून मोसंबीचे उत्पादन घेत आहे. यंदा डाळिंब लागवड केली आहे. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, अधिक उत्पादन देणारे वाण, श्रम कमी करणारी अवजारे यांचा वापर करावयाच्या असेल तर ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनास भेट दिलीच पाहिजे.

-महादेव वाघ, गेवराई खुर्द, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

कपाशी, तूर, सोयाबीन यांसह मिरची, भाजीपाला यांसारखी पिके घेतो. ॲग्रोवनच्या माध्यमातून रोज नवे काही तरी शिकायले मिळते. आज प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर अनेक नवीन यंत्रे प्रत्यक्ष हाताळता आली, हा अनुभव निश्‍चितच सुखद आहे.

-छाया महेश हुड, पाडळी, जि. छत्रपती संभाजीनगर

आमची पाच एकर शेती आहे. रेशीम शेती करत आहोत. वर्षभरात सहा बॅचपासून रेशीम कोष उत्पादन घेतो. रेशीम शेती अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देणारा पर्याय आहे. त्याबाबत माहिती प्रदर्शनातून मिळाली.

-भाग्यश्री नीलेश साध्ये, बोरगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

आमची दहा एकर शेती आहे. विविध भाजीपाला, फळपिकांचे उत्पादन घेतो. यंदा तुती लागवड करून रेशीम शेती सुरू केली आहे. ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनात बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या विविध मूल्यवर्धित पदार्थांची माहिती मिळाली. कृषी प्रदर्शनात मिळालेल्या ज्ञान व माहितीचा शेती करताना खूप उपयोग होतो.

-स्मिता रोरे व पती संतोष रोरे, गांधेली, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

शेतीकामांत उपयोगी पडणाऱ्या अनेक सयंत्र, अवजारांची माहिती मिळाली. यांची शेतीत श्रम आणि वेळ वाचविण्याची गरज आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यांत्रिकीकरणाविषयी जाणून घेण्याकरिता दिलेली भेट सत्कारणी लागली आहे.

- सोमीनाथ खांडेभराड, भायगाव, ता. अंबड, जि. छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com