Agriculture Exhibition : ‘अॅग्रोटेक’मध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचे सादरीकरण

Agrotech Agriculture Technology : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ च्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन, महोत्सवात विविध जिल्ह्यांतील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
Agriculture Exhibition
Agriculture ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ च्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन, महोत्सवात विविध जिल्ह्यांतील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशीही मोठी गर्दी झाली होती. आज (ता. २९) या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून समारोप होणार आहे.

दरवर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत २७ ते २९ डिसेंबर या काळात कृषी प्रदर्शन भरविले जाते. या वर्षी डॉ. देशमुख यांची १२५ जयंती असल्याने विशेष महत्त्व देण्यात आले. या प्रदर्शनात शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देणारी शासकीय दालने आहेत. उद्योग, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची दालनेही आहेत.

Agriculture Exhibition
Onion Production : दर्जेदार कांदा उत्पादनासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

सेंद्रिय शेतीमालाची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य, डाळी, इतर शेतीमालाची विक्री केली जात आहे. कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान व सिंचन आदी यंत्रसामग्रीचे दालनही आकर्षित करीत आहे. पशु-पक्ष्यांचेही प्रदर्शन भरविले आहे. गुलाबी बोंड अळींचे व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीचे प्रत्यक्ष मॉडेलसुद्धा ठेवण्यात आले आहे.

Agriculture Exhibition
Maharashtra Agricultural Production : ‌शेतकरी डी -मार्ट, ॲमेझॉनला जोडला जाणार, कृषी मंत्र्यांनी दिले निर्देश

संमेलनात विविध दालनांवर प्रामुख्याने तरुणपिढीचा सक्रिय सहभाग दिसतो आहे. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांची दालने आकर्षित करीत आहेत. उत्कर्ष पीडीकेव्ही अॅग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर (राबी) अंतर्गत प्रशिक्षण घेऊन उद्यमशील झालेल्यांचे खास दालनसुद्धा लक्षवेधी आहे. शेतीमालावर मूल्यवर्धन, रेशीम कापड निर्मिती, विद्यापीठ संशोधित पीकवाणांची बियाणे निर्मिती, कोंबडीपालन, यंत्र निर्मिती, आरोग्यवर्धक पदार्थ निर्मिती या ठिकाणी दाखविण्यात येत आहे.

उद्यानविद्या विभागाच्या दालनात पीडीकेव्ही प्रताप हे नवीन कवठ जात भाव खात आहे. अर्धा किलोपेक्षा जास्त आकाराची फळे खास प्रदर्शित केली गेली आहेत. शिवाय लिंबू, पेरू, आवळा, चिंच व इतर फळांपासून तयार केलेल्या खाद्य पदार्थांची सुद्धा या ठिकाणी माहिती दिली आहे.

शुक्रवारी दुपारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com