Nagpur News : केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय चहा महामंडळाने (इंडियन टी बोर्ड) देखील त्यांच्या सभासदांकरिता वनस्पती रोग नियंत्रण संहिता जारी केली आहे. ३०० पेक्षा अधिक पानांच्या असलेल्या या संहितेमध्ये कीटकनाशके फवारणीत पाण्याचा पीएच व स्वच्छ पाण्याचा वापर यासंबंधीचे महत्त्व ठळकपणे मांडले आहे. त्यामुळे इतर पिकांबाबत देखील पाण्याच्या पीएचबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विस्तार आघाडीकडून होत आहे.
संहितेमधील माहितीनुसार, कीटकनाशकांच्या फवारणीपूर्वी तयार करण्यात येणाऱ्या प्लँट प्रोटेक्शन फॉर्म्युलेशनची तपासणी करण्याकामी ते चहा संशोधन केंद्राकडे पाठविण्यात यावे. चहा बागांवर वापरण्यात येणारे रासायनिक घटक हे कीटकनाशक बोर्डाद्वारे प्रमाणित (लेबल क्लेम) असावेत. त्याबाबत चहा संशोधन मंडळ तसेच स्वयंसहाय्यता समूहांनी बैठकांच्या माध्यमातून छोट्या चहा बागायतदारांमध्ये जागृती निर्माण करावी.
प्लॅंट प्रोटेक्शन फॉर्म्युलेशनची सर्व बागायतदारांनी नोंद ठेवावी. पाण्याचे स्रोत, वनक्षेत्र, मानवी वस्त्यानजीक फवारणी टाळावी. कीटकनाशकांची साठवणूक कोरड्या आणि खेळती हवा असलेल्या परिसरात करावी. खाद्यान्नाचा साठा असलेल्या भागापासून कीटकनाशक लांब असावे. कीटकनाशकांची तीव्रता, प्राथमिक उपचार व इतर बाबींविषयीची माहिती साठवणूक असलेल्या परिसरात नोंदविण्यात यावी. फवारणी करणारे मजूर कुशल असावेत आणि त्यांनी फवारणी करताना पुरेशी दक्षता घ्यावी.
फवारणीकामी पाणी गुणवत्तापूर्ण असावे इंडियन टी बोर्डाने प्रकाशित केलेल्या संहितेमध्ये कीटकनाशकांची योग्य परिणामकारकता साधण्यासाठी पाण्याचा पीएच आणि क्षारता हे घटक मुख्य असल्याचे नमूद केले आहे.
तंत्रज्ञान व कृषी विस्तार आघाडी, शेतकरी संघटना पाणी योग्य दर्जाचे नसल्यास अपेक्षित परिणामकारकता नाही
स्प्रे लाइन नोझल ब्लॉक होत एकसमान परिणाम मिळत नाही.
शेततलाव, पाऊस, नदी, तलाव, बोअरवेल अशा विविध स्रोतांचे परिणाम वेगवेगळे राहतात.
अधिक पाऊसमान किंवा दुष्काळ या काळात देखील पाण्याची गुणवत्ता बदलती राहते.
नदी आणि सिंचन प्रकल्पातील पाण्यात गाळ, कचरा व इतर घटक असतात.
नदी, धरणातील पाण्याचा वापर गाळल्याशिवाय करू नये. त्याचा पीएच ५.५ पेक्षा कमी असेल तर हे पाणी वापरू नये.
अधिक जड पाणी असेल तर त्यामुळे देखील रसायनाची अपेक्षित परिणामकारकता मिळत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.