Summer Crops : दोन हजार हेक्टरवर उन्हाळी पिके

Crop Sowing Update : उन्हाळी पिकांचा पेरा १ हजार ९८४ हेक्टरवर झाला आहे. सिंचन योजनांच्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे.
Summer Crop Sowing
Summer Crop SowingAgrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईचा फटका उन्हाळी पिकांच्या पेरणीला बसला आहे. मात्र म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजनांचे आवर्तन सुरू असल्याने दुष्काळी पट्ट्यात मका पिकाची पेरणी सर्वाधिक झाली आहे. उन्हाळी पिकांचा पेरा १ हजार ९८४ हेक्टरवर झाला आहे. सिंचन योजनांच्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे.

जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे ३ हजार ५१८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. उन्हाळी हंगामात मका, सूर्यफूल भुईमूग पिकांची पेरणी केली जाते. जिल्ह्यात गतवर्षी पावसाने पाठ फिरवली तर परतीच्या पावसाने दडी मारल्याने सूर्यफूल आणि भुईमूग पिकांच्या पेरणीकडे शेतकरी वळाले नाहीत.

Summer Crop Sowing
Summer Crop : उन्हाळी पिकांत भुईमूग, तीळ पिकांना पसंती

त्यामुळे सूर्यफुलाच्या क्षेत्रात घट झाली आहे. तर भुईमूग पिकाची २६९ हेक्टरवर पेरा झाला आहे. जिल्ह्यात मका पिकाचे सरासरी क्षेत्र १७१० हेक्टर आहे. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत उन्हाळी हंगामात प्रामुख्याने मका पिकाची लागवड केली जाते.

म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजनांचे आवर्तन सुरू आहे. तर ताकारीचे आवर्तन बंद झाले आहे. या सिंचन योजनांच्या शाश्वत पाण्यामुळे यंदा पाणीटंचाई असूनही या तालुक्यांतील शेतकरी मका लागवडीकडे वळाले आहेत. जिल्ह्यात मका पिकाचा १ हजार ७१४ हेक्टरवर पेरा झाला आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत असून काही भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. काही भागात भुईमुगाची आगाप पेरणी झाली असून पीक फूल कळी अवस्थेत आहे. इतर भागात भुईमूग पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

Summer Crop Sowing
Summer Crops : तीन जिल्ह्यांत सरासरीच्या १९ टक्केच उन्हाळी पिके

चाऱ्याची लावगड वाढण्याची शक्यता

जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि जत या दुष्काळी तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात चारा टंचाई भासते. मात्र, गेल्या चार वर्षांत परतीचा पाऊस झाल्याने चाराटंचाई जाणवली नाही. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने चारा पिकाची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने ५ हजार ८४९ शेतकऱ्यांना ३५ हजार किलो वैरण बियाणे शंभर टक्के अनुदानावर वापट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा पिकांची लागवड वाढली आहे. उन्हाळी हंगामात ४८१ हेक्टरवर मका, कडवळ आणि इतर चारा पिकांची लागवड झाली आहे. दुष्काळी भागात सिंचन योजनांचे आवर्तन सुरू असल्याने चारा पिकांच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.

तालुकानिहाय पेरणी दृष्टिक्षेप

तालुका क्षेत्र (हेक्टर)

मिरज १०१.७

जत ३६३.५

खानापूर १९०

वाळवा २७

तासगाव १०२.५

शिराळा १७०

आटपाडी ४८९

कवठेमहांकाळ ५३९

पलूस १.७

कडेगाव २१०

एकूण १९८४.४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com