Samruddha Gram Yojana: मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना ग्रामविकासाचा चेहरा ठरेल

Smart Village: ग्रामविकासाचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना येत्या १७ सप्टेंबरपासून राज्यात राबवणार असून, सर्व योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या गावांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
Samruddha Gram Yojana
Samruddha Gram YojanaAgrowon
Published on
Updated on

Akola News: ग्रामविकासाचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना येत्या १७ सप्टेंबरपासून राज्यात राबवणार असून, सर्व योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या गावांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट रस्ते, स्वच्छता सुविधा, कार्यालये, शाळा, अंगणवाडी इमारती सुसज्ज असणाऱ्या आणि इतर निकष पूर्ण करून गावाचा विकास साधणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविण्यात येईल.

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या उपक्रमात सहभागी होऊन अधिकाधिक विकास साधावा, असे आवाहन, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांची आढावा बैठक संविधान सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

Samruddha Gram Yojana
Samruddha Gram Competition: मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेसाठी ग्रामपंचातींनी सज्ज व्हावे

खासदार अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.बैठकीच्या प्रारंभी ग्रामविकास मंत्र्यांनी १०० दिवसांच्या सातकलमी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

Samruddha Gram Yojana
CM Gram Sadak Yojana : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत आता काँक्रिटचे रस्ते

ते म्हणाले की, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संकेतस्थळाचा प्रभावी वापर व्हावा. ई-ऑफिस प्रणालीचा वापर करतानाच ब्रॉड बँड कनेक्टिव्हिटीचा प्रश्न मार्गी लावावा. सर्वांसाठी घर योजनेत महाराष्ट्रात यंदा विक्रमी ३० लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. शासनाने जाहीर केल्यानुसार घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून द्यावी. शिबिर व सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गरजूला घरकुल मिळवून द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

पंचायत समितीसाठी अद्ययावत इमारती

अकोला जिल्ह्यातील जुन्या इमारतीत असलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमारती पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३ पंचायत समिती इमारती पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठीही सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, बचत गटातील महिलांची उत्पादने सर्वदूर पोहोचावी यासाठी विपणनाचे भक्कम जाळे निर्माण करावे. ‘उमेद मॉल’ची निर्मिती करून या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी. ग्रामसमृद्ध योजनेत राज्य पातळी, विभागीय पातळी, जिल्हा पातळी व तालुका स्तरावर मोठ्या रकमेची बक्षीसे देण्यात येणार आहेत. त्यात सर्व गावांनी सहभागी होण्याचे आवाहन ही त्यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com