CM Gram Sadak Yojana : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत आता काँक्रिटचे रस्ते

Road Scheme Updates : राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत आता सिमेंट काँक्रिटचे रस्ते होणार आहेत. पूर्वी केवळ गावातून गेलेल्या अंतरातच काही मीटर लांबीचे काँक्रिटचे रस्ते व उर्वरित डांबरी रस्ते करण्यात येत होते.
CM Gram Sadak Yojana
CM Gram Sadak Yojana Agrowon
Published on
Updated on

Latur News : राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत आता सिमेंट काँक्रिटचे रस्ते होणार आहेत. पूर्वी केवळ गावातून गेलेल्या अंतरातच काही मीटर लांबीचे काँक्रिटचे रस्ते व उर्वरित डांबरी रस्ते करण्यात येत होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये मंजूर रस्ते आता सरसकट सिमेंट काँक्रिटचे होणार आहेत. जिल्ह्यात यंदा अशा १५९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी राज्य सरकारने २१७ कोटी रुपये निधीही मंजूर केला आहे.

योजनेचे कार्यकारी अभियंता असिफ खैराडी यांनी ही माहिती दिली. ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात दळणवळणाच्या सुविधा तयार करण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची उभारणी केली जाते. या योजनेच्या धर्तीवर मागील काही वर्षापासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवण्यात येत आहे. काही वर्षात योजनेतून मोठ्या संख्येने रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. ग्रामीण भागात योजनेतून मजबूत रस्ते तयार झाल्यामुळे दळणवळण सुकर झाले आहे.

CM Gram Sadak Yojana
Road Development Scheme : ‘चाळीसगाव तालुक्यातील रस्त्यांना मिळणार निधी’

या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचीही सोय झाली असून ऊसाच्या वाहतुकीसह शेतीला जाण्यासाठी मजबूत रस्ते उपलब्ध झाले आहेत. पूर्वी या योजनेत डांबरी रस्ते तयार करण्यात येत होते. केवळ गावातून जाणारा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात येत होता. हा रस्ता शंभर ते पाचशे मीटर लांबीचा असे. गावातील सांडपाणी व अन्य कारणांमुळे पाणी येऊन रस्ता नादुरुस्त होऊ नये, यासाठी सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येत होता. दुसरीकडे सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाचे रस्तेही सिमेंट काँक्रिटचे करण्यात येऊ लागले.

CM Gram Sadak Yojana
Parbhani Veterinary Colleges : परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच 

या रस्त्यांचे कामे वेगाने होण्यासोबत डांबरी रस्त्याच्या तुलनेत या रस्त्याचा दर्जा अनेक वर्षे चांगला राहू लागला. यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतही राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात २८ रस्ते

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोनमधून जिल्ह्यात यावर्षी २८ रस्ते होणार असून त्याची लांबी १५८.९०० किलोमीटर आहे. त्यासाठी २१७ कोटी ७९ लाख २८ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. यात अहमदपूर व चाकूर तालुक्यात पाच, उदगीर व जळकोट तालुक्यात आठ, निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यात दहा तर औसा तालुक्यात पाच रस्त्यांचा समावेश असल्याचे कार्यकारी अभियंता खैराडी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com