Santosh Deshmukh Murder Case: वाल्मीक कराडच संतोष देशमुख हत्येचा सूत्रधार: सीआयडी अहवालातील धक्कादायक खुलासे!

CID Chargesheet : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. सीआयडीच्या ‘एसआयटी’ने दाखल केलेल्या दीड हजार पानांच्या दोषारोपपत्रानुसार, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Walmik Karad
Walmik KaradAgrowon
Published on
Updated on

Beed News: राज्यभर गाजत असलेल्या मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच असल्याचे सीआयडीच्या ‘एसआयटी’ने केलेल्या तपासातून समोर आले आहे. गुन्ह्याच्या ८० दिवसांनी गुरुवारी (ता. २७) एसआयटी प्रमुख व गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली, किरण पाटील तसेच खंडणी प्रकरणाचे तपास अधिकारी अनिल गुजर पाटील, विशेष सहाय्यक सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी हे दीड हजार पानांचे दोषारोपपत्र येथील विशेष मोक्का न्यायालयात दाखल केले होते.

दीड हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अनेक गंभीर खुलासे समोर आले आहेत. २९ नोव्हेंबर रोजी वाल्मीक कराडने अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी सुनील शिंदे यांना विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर सहा डिसेंबरला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांनी पवनचक्कीवर भांडण केल्यानंतर सुदर्शन घुले यानेही तुला सोडणार नाही, अशी धमकी संतोष देशमुख यांना दिली होती. ‘खंडणीला आडवे येणाऱ्याला आडवे करा,’

Walmik Karad
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

असा निरोप वाल्मीक कराडने विष्णू चाटेला दिला. विष्णू चाटेने संतोष देशमुख यांना तशा धमकीचा निरोप दिला होता. त्यानंतर नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे सीआयडीच्या विशेष तपास पथकाने वाल्मीक कराडला पहिल्या क्रमांकाचा आरोपी केले आहे. तर, विष्णू चाटे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. सुदर्शन घुले तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी असून, प्रतीक घुले चौथ्या, तर सुधीर सांगळे पाचव्या क्रमांकाचा व महेश केदार सहाव्या आणि जयराम चाटे सातव्या तर फरार असलेला कृष्णा आंधळे आठव्या क्रमांकाचा आरोपी आहे.

Walmik Karad
Santosh Deshmukh Murder Case : डाग पुसणार की आणखी गडद होणार?

या प्रकरणात पोलिसांनी संतोष देशमुख यांचे लोकेशन आरोपींना पुरविल्याच्या आरोपावरून मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याला आरोपी करून अटक केली. दोषारोपपत्रातून त्याला वगळण्यात आले आहे. सरकारे या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. तर, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश श्री. तहलियानी देखील या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करत आहेत.

‘तर आपण भिकाला लागू...

दरम्यान, सहा डिसेंबरला पवनचक्की प्रकल्पावर भांडण झाल्यानंतर गावचे प्रमुख म्हणून संतोष देशमुख घटनास्थळी गेले. त्यांच्याकडून मारहाण करणाऱ्या घुले, सांगळे यांना प्रत्युत्तर देण्यात आले. यानंतर सुदर्शन घुले याने हा प्रकार वाल्मीक कराडला सांगितल्यानंतर त्याने ‘आडवे येणाऱ्यांना आडवे करा असेच कोणीही आडवे आले तर आपल्याला खंडणी मिळणार नाही आणि आपल्याला भीक मागावी लागेल,’ असे सुदर्शन घुलेला सांगितले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com