
China News: तंत्रज्ञान, संरक्षण यांसह अनेक क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या चीनने आता कृषी क्षेत्रातही नवी झेप घेतली आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये अमेरिका, तुर्की या देशांना चीनने मागे टाकले असून, २,०२,३४३ हेक्टर जागेवर स्ट्रॉबेरीची शेती केली आहे.
क्षेत्रफळानुसार पॅरिस शहराच्या वीसपट जागेवर ही शेती असून, चीनमधील स्ट्रॉबेरीचे उत्पादन ३३ लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. चीनमधील स्ट्रॉबेरी इंडस्ट्रीला सध्या सोन्याचा भाव आला असून, चीनमध्ये उत्पादित केलेली स्ट्रॉबेरी जगाच्या विविध भागांत विक्रीसाठी पाठवली जात आहे. चीनने स्ट्रॉबेरी लागवडीकडे केलेली गुंतवणूक आणि या क्षेत्राच्या विकासासाठी केलेले प्रयत्न सध्या जगभर चर्चेचा विषय ठरले आहेत.
दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड करून, चीनने मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी उत्पादन केले नाही, तर जागतिक शेतीसाठी एक नवीन मानदंडही प्रस्थापित केला आहे. स्ट्रॉबेरीचा महत्त्वाचा ग्राहक असलेला फ्रान्स केवळ ३५०० हेक्टर क्षेत्रातच स्ट्रॉबेरी लागवड करतो. विविध फळांच्या निर्मितीत चीनने आघाडी घेतली असून, त्यात स्ट्रॉबेरीचा क्रमांक वर आहे.
हा विस्तार केवळ अनुकूल हवामानाची स्थिती पाहून केला नसून, त्यामध्ये सूक्ष्म नियोजनाचा समावेश आहे. चीनच्या सरकारने स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि त्याला प्रोत्साहनही दिले. देशाच्या शेतीचे रूपांतर फलोत्पादनाच्या एका महत्त्वाच्या केंद्रात करण्यात सरकारचा सहभाग निर्णायक ठरला आहे.
शेतीसाठी चीनने केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रभाव देशांतर्गतच नाही, तर जागतिक स्तरावरही दिसून येणार आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या पद्धती बदलत असताना, इतर देशांनाही वाढत्या मागणीपुढे मात करण्यासाठी चीनच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल किंवा चीनसोबत सहकार्य करावे लागणार आहे. चीनने याबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर
स्ट्रॉबेरी शेतीसाठी चीन एआय, ड्रोन, सेन्सर यांच्या मदतीने उत्पादन वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे चीनमधील स्थानिक माध्यमे म्हणतात. तापमान सेन्सर्स आणि स्पेक्ट्रल कॅमेरे यांच्या आधारे झाडांच्या वाढीचे निरीक्षण करतात, त्यामुळे शेतकरी ‘रीअल-टाइम डेटा’च्या आधारे लागवड अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात. चीनने पारंपरिक स्ट्रॉबेरीच्या जाती आणि नव्या संकरित प्रजातींना एकत्र जुळवण्यासाठी अल्गोरिदमचा वापर केल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.