Strawberry Production: बोरगावचा घाटमाथा स्ट्रॉबेरी उत्पादनात अव्वल! शेतकऱ्यांचे अर्थकारण बहरले

Strawberry Farming: सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसराने पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून स्ट्रॉबेरी उत्पादनात मोठी प्रगती केली आहे. महाबळेश्वरनंतर या भागाची स्ट्रॉबेरीसाठी विशेष ओळख निर्माण झाली असून, थेट विक्री आणि परराज्यातील मागणीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बहरले आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगांमुळे येथील शेतीत आमूलाग्र बदल होत आहे.
Strawberry
StrawberryAgrowon
Published on
Updated on

Nashik News: पारंपरिक शेतीला पर्याय देत जिल्ह्यात प्रामुख्याने सुरगाणासह कळवण तसेच दिंडोरी, पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकात नवी ओळख निर्माण केली आहे. राज्यात महाबळेश्‍वरनंतर सुरगाणा तालुक्यातील बोरगावचा घाटमाथा परिसर स्ट्रॉबेरी उत्पादनात नावारूपास आला आहे. पर्यटकांची रेलचेल असल्याने थेट विक्री, गुणवत्तेमुळे परराज्यात पुरवठा तर दुय्यम प्रतवारीच्या मालाला प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलवले आहे.

गेल्या २५ वर्षांपूर्वी काही मोजक्या शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी लागवडी झाल्याचे शेतकरी सांगतात. पुढे सुधारित लागवड पद्धती, वाण बदल, रोपे निर्मिती, पीक संरक्षण उपाययोजना यातून टप्प्याटप्प्याने क्षेत्र विस्तारले असून, सुरगाणासह परिसरात १,००० हेक्टरवर लागवडी आहेत. सन २००० नंतर ‘सेल्वा’ वाणाची लागवड केली जायची.

Strawberry
Strawberry Farming: भीमाशंकरमध्ये स्ट्रॉबेरीचा बहर! शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

त्यात बदल करून २०१० मध्ये ‘स्वीट चार्ली’, ‘चांडलार’ वाण येथे रुजला, उत्पादकता वाढली. पुढे २०१५ नंतर ‘विंटर डाउन’ हा नवा वाण हाती आला. आता एम-२, मिलिसा असे वाण होऊ लागले आहेत. सुरगाणा तालुक्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावरील बोरगाव, घागबारी परिसरांत २५ गावे, तर कळवण तालुक्याच्या पश्‍चिम भागात पळसदरचे खोरे, सुकापूर तर दिंडोरी व पेठ तालुक्यांतही क्षेत्र वाढत आहे.

लागवड क्षेत्रात वाढ होत असून मातृरोपांपासून अभिवृद्धी करत रोग निर्मितीचे तंत्र ही अवगत केले आहे. दिवाळीनंतर रोजगारासाठी होणारे स्थलांतर गेल्या काही वर्षांत थांबले आहे. थेट उत्पादन ते विक्रीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून ही या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याने येथे क्षेत्र विस्तारत आहे.

...अशा आहेत लागवडी तालुकानिहाय क्षेत्र

तालुका लागवड (हेक्टर)

सुरगाणा ४४४.४०

कळवण ४७१

दिंडोरी २०२

पेठ ३.५

Strawberry
Strawberry Farming : पालघरमध्येही बहरणार स्ट्रॉबेरीचे मळे

परराज्यांत मागणी; पुरवठा वाढला

स्ट्रॉबेरीची काढणी झाल्यानंतर शेतकरी हाताळणी व प्रतवारी केलेल्या लाल चुटूक, आकर्षक फळांना मागणी असते. तर दुय्यम प्रतवारीचा माल मागणीनुसार प्रक्रिया उद्योगांना पुरवला जातो. गुजरातमधील पर्यटक सप्तशृंगगड, शिर्डी, नाशिक, त्रंबकेश्‍वर येथे या परिसरातून जात असतात. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक विक्री करतात. तर दुय्यम प्रतवारीच्या मालाची प्रक्रिया उद्योगाकडून मागणी असते. डिसेंबर ते मार्च हा प्रमुख हंगाम असतो. पूर्वी मुंबई, बडोदा, अहमदाबाद, सुरत, बडोदा येथे पुरवठा व्हायचा. आता पुणे, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई येथील व्यापाऱ्यांकडूनही मागणी असते.

१९९६ पासून लागवडी सुरू झाल्या. प्रामुख्याने २००० नंतर सुधारित पद्धतीने लागवडी केल्या. यांसह वाण बदल झाल्याने उत्पादनात वाढ झाल्याने उत्पन्न वाढ झाली आहे. क्षेत्र वाढत असल्याने प्रक्रिया उद्योगांची गरज आहे.
अशोक भोये, स्ट्रॉबेरी उत्पादक, घोडांबे, ता. सुरगाणा
पूर्वी पारंपरिक पिकातून उत्पन्न मर्यादित होते; मात्र स्ट्रॉबेरी पिकाने या भागात शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवली आहे. शेतकऱ्यांनी काळानुसार पीक पद्धतीत बदल केल्याने जीवनमान सुधारले आहे.
देवेंद्र गायकवाड, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, उंबरपाडा दिगर, ता. सुरगाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com