Belkhed Pedha : बेलखेडच्या पेढ्यांचा ‘स्वाद’ पोहोचला सर्वदूर

Traditional Indian Sweet : साधारणपणे ६० वर्षांपूर्वी बेलखेड येथील महादेव निमकर्डे यांनी केलेली ही ‘गोड’ सुरुवात आज तिसऱ्या पिढीकडे आली आहे. १९६१ मध्ये मोहन आणि पुंजाराम निमकर्डे यांनी पेढे निर्मितीला सुरुवात केली.
Belkhed Pedha
Belkhed Pedha Agrowon
Published on
Updated on

Akola News : जिल्हा मुख्यालयापासून साधारणपणे साठ किलोमीटरवर वसलेले बेलखेड हे गाव आज एका खास गोष्टीसाठी ओळखले जाते, ते म्हणजे पेढे. पारंपरिक पद्धतीने तयार केला जाणारा हा पेढा चवीने मन जिंकतोच, पण त्यामागची कथाही तितकीच सुरस आहे.

साधारणपणे ६० वर्षांपूर्वी बेलखेड येथील महादेव निमकर्डे यांनी केलेली ही ‘गोड’ सुरुवात आज तिसऱ्या पिढीकडे आली आहे. १९६१ मध्ये मोहन आणि पुंजाराम निमकर्डे यांनी पेढे निर्मितीला सुरुवात केली. या पेढ्यांसाठी १२ किलोमीटरवरून सायकलीवर दूध आणले जायचे. त्यापासून पेढे बनवण्यास सुरुवात केली. रसायन विरहित, चुलीवर बनवलेल्या या पेढ्याला एक पारंपरिक स्वाद होता तोच आजही कायम ठेवण्याचे काम झाले आहे.

Belkhed Pedha
Rajur Kandi Pedha : राजूचा कंदी पेढा खाल्लाय का?

आज अतुल, प्रवीण आणि मिलिंद निमकर्डे हेच काम सचोटीने पुढे नेत आहेत. दिवसातून दोन वेळा पेढा तयार होतो. दिवसभरात साधारणपणे ४० किलो पेढा जागेवरूनच विकला जातो. तेल्हारा या तालुका मुख्यालयापासून तीन किलोमीटरवर असलेल्या बेलखेड गावच्या बसस्थानक परिसरात निमकर्डे यांचे हॉटेल आहे. या ठिकाणी इतर खाद्य पदार्थांबरोबरच खासकरून पेढा हा आकर्षण ठरलेला आहे.

या पेढ्यांची खासियत म्हणजे त्यात कोणतेही रसायन वापरले जात नाही. हे पेढे फ्रीजशिवायही १५ दिवस ताजे राहतात. यामुळेच त्यांचा स्वाद अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ५६ भोगांपर्यंत पोहोचला. देशातील अनेक दिग्गज नेत्यांनीही याची चव चाखली. त्यात माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे अनेक जण आहेत.

Belkhed Pedha
Pandharpur peda : लई भारी... जिभेवर रेंगाळणारी पंढरपूरच्या पेढ्याची चव

बेलखेडचा हा पेढा आज लॉस एंजलीस, रशिया, कॅनडा, श्रीलंका या ठिकाणीही गेलेला आहे. गावातील लोक आपल्या नातलगांना, मित्रांना येथील पेढे पाठवतात. फक्त गोडवा नाही, तर गावचा अभिमान आणि आठवणीही त्यात असतात.बेलखेड पेढ्यांबरोबरच कबड्डी खेळासाठीही ओळखले जाते.

विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांचे येथे आयोजन केले जाते. शेतीसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. येथील ७० टक्के शेती बागायती आहे. फळबागांसह शेतकरी विविध पिके घेतात. याच गावाची ओळख वाढवण्यात निमकर्डे यांच्या पेढ्याने मोठी भूमिका निभावली आहे. ‘गोडवा हा केवळ चवीत नाही, तर त्या मागच्या कष्टांतून, नात्यांतून आणि परंपरेतूनही तयार झालेला आहे.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com