Team Agrowon
साताऱ्याचे कंदी पेढे आपल्या महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रसिध्द आहे.
आपल्या विशिष्ठ चवीसाठी सातारच्या कंदी पेढ्यांना विशेष मागणी आहे.
साताऱ्यासह महाराष्ट्रात इतरही ठिकाणी कंदी पेढा तयार केला जातो.
अहमदनगरचं राजूर हे गावही तेथील कंदी पेढ्यांसाठी प्रसिध्द आहे.
मोठ्या कढईमध्ये खवा भाजून कंदी पेढा तयार केला जातो.
कढईतील खवा हाताने सतत हलवून त्याला एक विशिष्ठ रंग येईपर्यंत भाजावा लागतो.
त्यानंतर कोणत्याही यंत्राशिवाय हे पेढे हाताने वळून तयार केले जातात.