Team Agrowon
बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तुरीच्या ‘बीडीएनपीएच १८-५’ या संकरित वाणाची भारताच्या मध्य विभागासाठी शिफारस करण्यात आली आहे.
बदनापूर कृषी संशोधन केंद्राने संशोधित केलेले ‘बीडीएन-७११,’ ‘गोदावरी’ आदी पांढऱ्या रंगाचे तुरीचे वाण शेतकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस उतरले आहे.
याबरोबरच ‘बीडीएन ७१६’, ‘बीएसएमआर ७३६’ हे केंद्राने संशोधित केलेले लाल तुरीचे वाण आहे.
यापूर्वी ‘बीएसएमआर ८५३’ हा या केंद्राने संशोधित केलेला तुरीचा वाण खूप प्रचलित होते.
महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांद्वारे शिफारस करण्यात आलेले ‘बीडीएनपीएच १८-५’ हे पहिलेच तुरीचे संकरित वाण आहे.
रंगाने पांढऱ्या असणाऱ्या या वाणाची उत्पादकता १७५९ ते २१५९ किलोग्रॅम प्रतिहेक्टर आहे.
हा वाण १५५-१७० दिवसांत तयार होतो. मर आणि वांझ या प्रमुख रोगांना तो मध्यम प्रतिकारक आहे.