Tur Farming : देशातील तूर उत्पादनात २० टक्के घटीचा अंदाज

राज्यात तूर पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र 12 लाख 75 हजार असून यंदा प्रत्यक्ष 13 लाख 35 हजार हेक्टवर यंदा लागवड झाली. यंदा प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता 818 किलो रोहण्याचा अंदाज आहे.
Tur Crop
Tur Crop
Published on
Updated on

राज्यात किड-रोगामुळे उत्पादकता आणि गुणवत्तेवर परिणाम पुणे : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात तूर पिकाला किड-रोगाचा फटका बसला आहे. राज्यातील जवळपास सर्वंच भागांत कमी अधिक प्रमाणात मर रोग, शेंगा पोखरणारी अळी आणि पानाफुलांची जाळी करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाने (Agriculture Department) सांगितले. तर यंदा तूर उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट येईल, असे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगाकडून सांगण्यात आले. (tur production in india may decrease by twenty percent)

राज्यात तूर पिकाचे (Tur Crop) सरासरी पेरणी क्षेत्र 12 लाख 75 हजार असून यंदा प्रत्यक्ष 13 लाख 35 हजार हेक्टवर यंदा लागवड झाली. यंदा प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता 818 किलो रोहण्याचा अंदाज आहे. तसेच प्रथम अंदाजानुसार उत्पादन (Farm Production) 10 लाख 84 हजार टनांवर राहिल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मात्र यंदा सततचा पाऊस (Rains) आणि बदलत्या वातावरणामुळे (Climate Change) पिकावर किड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. 

पहा व्हिडिओ - 

कृषी विभागाच्या मते, मराठवाड्यात ४ लाख ९३ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली. त्यापैकी उस्मानाबाद, परभणी, नांदेड लातूर, औरंगाबाद व बीड या जिल्ह्यांत 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावर मर रोग, शेंगा पोखरणाऱ्या अळया व पानाफुलांची जाळी करणारी अळीचा प्रादुर्भाव  दिसून आला. म्हणजेच मराठवाड्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी २८.३९ टक्के क्षेत्रावर या किड-रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला होता. तसेच लातूर विभागात ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या अळयांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर काही तालुक्यांमध्ये धुके पडल्यामुळे फुलगळ झाली असून पानथळ, जमिनी, नदी नाल्या काठच्या जमिनी, अतिवृष्टीमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला, असे कृषी विभागाने सांगितले. 

तर विदर्भात ६.२४ लाख हेक्टरव यंदा तुरीचे पीक आहे. तर अकोला, बुलडाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यांत 47 हजार हेक्टर क्षेत्रावर किड-रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे कृषी विभागाने सांगितले. म्हणजेच जवळपास साडेसात टक्के क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला होता.

सध्या तूर पीक अनेक भागांत काढणीच्या अवस्थेत आले आहे. तर काही भागांत शेंगा पक्व अवस्थेत आहे. मात्र किड-रोगाने उत्पादकता १५ ते २० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता व्यापारी आणि उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सध्या नविन तुरीची बाजारात आवक होतेय. मात्र किड-रोगामुळे गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. बाजारात सध्या येणाऱ्या तुरीची गुणवत्ता कमी असून ओलावा अधिक असल्याचेही व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगाकडून सांगण्यात आले. 

काय आहे उद्योगांचा अंदाज?

व्यापारी तसेच प्रक्रिया उद्योगांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात तूर पिकाला १५ ते २० टक्क्यांपर्यंत फटका बसल्याचे सांगितले. आयग्रेन इंडियाने महाराष्ट्र आणि कर्नाटकात तूर उत्पादक क्षेत्रांत सर्वेक्षण केले होते. यातून दोन्ही राज्यातील उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा निष्कर्ष काढण्यात आला. कर्नाटकातील गुलबर्गा, तलिकोट आणि बिदर या महत्वाच्या तूर उत्पादक जिल्ह्यांसह इतरही जिल्ह्यांत पिकाला फटका बसल्याचे जाणकारांनी सांगितले. 

आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तूर उत्पादक जिल्ह्यांतील पिकाचा आढावा घेतला. पाऊस, बदलते वातावण आणि किड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात तूर उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे. तसेच मालाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे.  - राहुल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया

यंदा जूनपासून डिसेंबरपर्यंत पाऊस पडतोय. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढल्याने अनेक भागात पिकाची वाढ समाधानकारक नाही. पश्चिम महाराष्ट्रात विषाणूजन्य वांझ रोगाचा ३० ते ३५ टक्के प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांनी यापुढे तुरीची लागवड करताना या विषाणुला प्रतिकार करतील अशाच वाणांची लागवड करावी. - डाॅ. नंदकुमार कुटे, प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, नांदेड लातूर, औरंगाबाद व बीड या जिल्ह्यांत 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावर मर रोग, शेंगा पोखरणाऱ्या अळया व पानाफुलांची जाळी करणारी अळीचा प्रादुर्भाव  दिसून आला. तर विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यांत 47 हजार हेक्टर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला आढळले.  - विकास पाटील, संचालक, कृषी विस्तार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com