Central Government Initiative : सेंद्रिय शेतीमालासाठी केंद्राकडून नवी प्रणाली लागू!

New Portal System : देशातील सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण व विपणनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने नवी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.सेंद्रिय शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेत प्रमाणीकरण हाच कळीचा मुद्दा आहे.
NPOP Portal and Organic Promotion Portal
NPOP Portal and Organic Promotion PortalAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशातील सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण व विपणनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने नवी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.सेंद्रिय शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेत प्रमाणीकरण हाच कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी केंद्राकडून देशभर ‘राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम’ (एनपीओपी) आधीपासून राबविला जात होता.

मात्र, त्याकरिता संगणकीय सेवेची प्रणाली नव्हती. आता मात्र ही उणीव भरून काढण्यात आली आहे. केंद्राने एक नव्हे तर ‘एनपीओपी पोर्टल’ व ‘ऑर्गेनिक प्रमोशन पोर्टल’ अशा दोन प्रणाली नुकत्याच सादर केल्या आहेत. यात ‘एनपीओपी पोर्टल’मुळे प्रमाणीकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आहे. तसेच, सहभागी घटकांना (स्टेकहोल्डर्स) जलद सेवा मिळणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

NPOP Portal and Organic Promotion Portal
Organic Farming : पैशांपेक्षा समाधान, आरोग्याला दिले महत्त्व

केंद्राने नव्याने आणलेल्या ‘ऑर्गेनिक प्रमोशन पोर्टल’ प्रणालीचा लाभ थेट शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) व निर्यातदारांना मिळणार आहे. सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण, व्यापाराला प्रोत्साहन तसेच जागतिक आयातदारांना सुविधा असे तिहेरी उद्दिष्ट या पोर्टलचे असेल. या प्रणालीतून सेंद्रिय शेतीमालाच्या उत्पादनातील घटकांचे ऑनलाइन प्रशिक्षण, क्षमता बांधणी तसेच व्यापार कार्यक्रम घेण्याची सोय उपलब्ध राहील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

कृषी आयुक्तालयातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, केंद्र शासनाने आणलेल्या नव्या प्रणाली अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. परंतु, या प्रणालीमुळे सेंद्रिय शेतीमालाच्या क्षेत्राला बळकटी मिळेल. या प्रणाली तयार करण्यापूर्वी केंद्राने राज्यांकडून अभिप्राय घेतले होते. सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी यापूर्वी ‘सहभाग हमी प्रणाली’ (पीजीएस-पार्टिसिपटरी गॅरंटी सिस्टिम) वापरली जात होती.

NPOP Portal and Organic Promotion Portal
Organic Farming : संतुलित सेंद्रिय आणि रासायनिक खत वापरून मिळवले उत्कृष्ट उत्पादन

ही पद्धत अधिक विश्वासार्ह नव्हती. परंतु, केंद्राने लागू केलेल्या नव्या प्रणाली व पद्धतींमुळे प्रमाणीकरणातील अडथळे दूर होण्याची अपेक्षा आहे. नव्या रचनेत सेंद्रिय शेतीमालाच्या उत्पादन व विक्री साखळीतील मागोवा (ट्रेसेबिलिटी) प्रणाली बळकट होणार आहे. त्याचा प्रत्यक्ष लाभ सेंद्रिय उत्पादनांच्या देशी व विदेशी व्यापारात होण्याची चिन्हे आहेत.

‘एनपीओपी’ सुधारित आवृत्ती लागू

राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाची (एनपीओपी) सुधारित म्हणजेच आठवी आवृत्ती लागू करण्यात आली आहे. त्यासाठी दिल्लीत अलीकडेच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम घेण्यात आला. याचवेळी एनपीओपी पोर्टल व ऑर्गेनिक प्रमोशन पोर्टल प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय यावेळी ‘अपेडा पोर्टल’, ‘ट्रेसनेट २.० पोर्टल’ आणि ‘अॅग्रीएक्सचेंज पोर्टल’ अशा तीन संगणकीय सेवा प्रणालीच्या नव्या आकृत्यांचेदेखील उद्घाटन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com