Fodder Shortage : वागद शिवारात गोधन चाऱ्याअभावी विक्रीला

Fodder Scarcity : दुधदुभत्यांमध्ये स्वयंपूर्ण असलेल्या महागाव तालुक्‍यातील वागद गावातही गेल्या दोन वर्षांत चारा, पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.
Fodder Shortage
Fodder ShortageAgrowon

Yavatmal News : दुधदुभत्यांमध्ये स्वयंपूर्ण असलेल्या महागाव तालुक्‍यातील वागद गावातही गेल्या दोन वर्षांत चारा, पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. परिणामी, गावातील गोवंशाची संख्या सातत्याने कमी होत ती १०००-१५०० वरून अवघ्या ३५० ते ३०० वर आली आहे. विशेष म्हणजे यातील एकट्या जाधव कुटुंबातील तीन भावंडांकडेच ५५० गाई होत्या.

जमिनीची सुपीकता वाढावी, या उद्देशाने जनावरांचे संगोपन करणाऱ्यांची संख्या वागद (ता. महागाव) परिसरात मोठी होती. जनावरांपासून मिळणाऱ्या शेणखताचा वापर शेतीत केला जात होता. त्यामुळे जमिनीचा पोतही जपला जात होता, असे प्रयोगशील शेतकरी मनीष जाधव सांगतात. याच जाधव परिवारातील लच्चू, मंगू तसेच गोबरा नाईक या भावंडांकडे मोठ्या संख्येने गोधन होते.

Fodder Shortage
Fodder Shortage : चारा टंचाई टाळण्यासाठी कोणते उपाय कराल?

त्यांचाच वारसा जपत मनीष जाधव व त्यांचे काका वामनराव, भाऊराव, दिलीपराव, शंकर तसेच रमेश जाधव यांनी देखील गो-संगोपनावर भर दिला. ते चारा आणि धान्यासाठी ज्वारी लागवडीसाठी पुढाकार घेत होते. गायरानाचा पर्यायदेखील गुरे चारण्याकामी राहायचा. परंतु गेल्या काही वर्षांत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

वन्यजीवांची पावले गावाकडे वळल्याने त्यांच्याकडून शेतीतील उभ्या पिकाचे नुकसान सुरू झाले. परिणामी, ज्वारीखालील क्षेत्र कमी झाले. गायरान अतिक्रमित झाले तर वनविभागाकडून निर्बंध लादण्यात आल्याने जंगलातही गुरे चारण्याचा पर्याय उरला नाही. रब्बी हंगामातील हरभरादेखील रानडुक्‍कर फस्त करू लागले.

Fodder Shortage
Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी गोधन विक्रीसाठी काढले. आता गावशिवारांत ३५० जनावरे शिल्लक उरलेली आहेत. चाऱ्याअभावी त्यांनाही जगविणे जिकरीचे झाल्याचे जाधव सांगतात. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने जाधव कुटुंबीयांकडे गोधन असल्याने काही जातिवंत गोऱ्हे इतर शेतकऱ्यांना शेतीकामी दिली जात होती. हे सारे वैभव आता संपल्यात जमा आहे.

विविध आजारांचीही समस्या

जनावरांमध्ये बळवणारे विविध आजार, वेळेवर उपचार न मिळणे, गावस्तरावर चराई करता गुराखीदेखील न मिळणे त्यासोबतच चारा आणि पाण्याची समस्या अशी अनेक कारणे गोधन कमी होण्यामागे सांगितली जातात.

जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी जनावरांचे संगोपन करण्यावर कुटुंबीयांनी भर दिला होता. तीन भावंडांचीच मिळून ५५० गुरे होती. परंतु आमच्या गावशिवारांतच ३०० ते ३५० इतकी जनावरे शिल्लक राहिली आहेत. दुधाऐवजी शेतीकामी लागणाऱ्या शेणखताची उपलब्धता जनावरांद्वारे होत असल्याने संगोपनावर भर दिला जात होता. आता मात्र दिवसेंदिवस चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने जनावरे विक्रीशिवाय पर्याय राहिला नाही.
- मनीष जाधव, शेतकरी, वागद, जि. यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com