Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar Press Conference : सत्ता स्थापनेचा महायुतीचा दावा; शिंदेंची भूमिका गुलदस्त्यात, अजित पवार यांची मिश्किल टिप्पणी

Mahayuti claim to form government : आज भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांनी भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस निवड केली.
Eknath Shinde and Ajit Pawar Press Conference
Eknath Shinde and Ajit Pawar Press ConferenceAgrowon
Published on
Updated on

Pune News : भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज निवड झाली आणि त्यांच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवनावर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर तिघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये उद्या होणारा शपथविधी आणि सत्तास्थापनेसंदर्भात माहिती देण्यात आली.

मतदारांचे आभार मानतो : शिंदे

यावेळी शिंदे यांनी, महायुती सरकारच्या काळात आम्ही टीम म्हणून काम केलं असून पुढेही एक टीम म्हणून काम करणार असल्याचे सांगितले. तर आमच्यात कोण लहान-कोण मोठा नसून आम्ही एक टीम आहोत. राज्यात ज्या प्रकारे आम्ही काम केलीत, जे निर्णय घेतले, अनेक विकास प्रकल्प मार्गी लावले, यामुळे आम्हाला जनतेनं भरपूर दिले आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्राला १० ते २० वर्षे मागे नेणारे निर्णय घेतले. मात्र आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकल्प राबवले. आम्ही डबल इंजिनचे सरकार म्हणून अडीच वर्षात जी कामं केलीत, त्याचा फायदा जनतेला झाला. त्याबद्दल मतदारांचे आभार मानत असल्याचे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde and Ajit Pawar Press Conference
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड; मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा

फडणवीस यांनी माझे नाव मुख्यमंत्री म्हणून सूचवले. त्यांनी मला संधी मिळवून दिली. याचा मला आजही आनंद आहे. आम्ही लोकांसाठी योजना फक्त जाहीर केल्या नाहीत तर त्या पूर्ण केल्याचे शिंदे म्हणाले.

शिंदेंनी सरकारमध्ये सामिल व्हावे : फडणवीस

दरम्यान, फडणवीस यांनी, आम्ही महायुती म्हणून राज्यपालांची भेट घेतली असून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. ५ डिसेंबरला सरकारचा शपथविधी होणार आहे. मी एकनाथ शिंदेंना भेटून कालच त्यांनी मंत्रीमंडळात राहावं, अशी विनंती केली आहे. याबाबत ते सकारात्मक प्रतिसाद देतील अशी खात्री आहे. यामुळे आता पुन्हा एकदा आम्ही मित्रपक्ष मिळून राज्याला एक चांगले आणि स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Eknath Shinde and Ajit Pawar Press Conference
Chief Minister M K Stalin : तमिळनाडूला फेंगलचा फटका! मुख्यमंत्री स्टलिन यांची केंद्राकडे २ हजार कोटी रूपयांची मागणी

मी तर उद्याच शपथ घेणार : अजित पवार

तर अजित पवार यांनी, आपण दिल्लीला अचानक नाही तर आपल्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. पण पत्रकारांनी आणि काही लोकांनी चांगल्या बातम्या चालवल्या म्हणत पत्रकारांचा चिमटा काढला. एकनाथ शिंदे कधी शपथ घेणार? या प्रश्नावरून, बाकीच्या कुणाचे माहीत नाही. पण आपण उद्याच शपथ घेणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. यामुळे एकच हशा पिकला.

एकीकडे हशा पिकत असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शपथविधी आणि सरकारमध्ये सामिल होण्याच्या प्रश्नावर उत्तर दिले. त्यांनी, थोडं थांबा, संध्याकाळपर्यंत सगळी माहिती दिली जाईल. असाच प्रतिसाद अजित पवार यांनी देताना थोडी कळ काढा, शिंदेंच संध्याकाळी समजेल, अशी मिश्किल टिप्पणी केली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com