Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड; मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा

Maharashtra Politics : राज्यात महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisagrowon
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्यात महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. बुधवारी (ता.०४) पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. सर्व आमदारांनी एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती देत त्यांची निवड केली.

सकाळी ११ वाजता विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक होती. या बैठकीत भाजपाचे १३२ आमदार त्याशिवाय भाजपला पाठिंबा दिलेले ५ इतर आमदारही उपस्थित होते. या बैठकीला सुरुवात होण्याआधी नेत्यांनी पक्षाचे निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत केले. बैठकीआधी भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यात प्रस्ताव कोण मांडणार, सूचक, अनुमोदक कोण असणार हे ठरवण्यात आले होते.

या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला पंकजा मुंडे, प्रविण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उइके, आशिष शेलार, योगेश सागर, गोपीचंद पडळकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर या प्रस्तावाला भाजपाच्या सर्व आमदारांनी एकमताने मंजुरी दिली.

Devendra Fadnavis
Maharashtra CM Selection : मुख्यमंत्री आज ठरणार

फडणवीसचं राज्याचे मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस हेच आता राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. गुरूवारी(ता.०५) सायंकाळी ५ वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी निर्णय बदलला आहे. उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे यांना गृह खात्याऐवजी नगरविकास आणि आणखी एखादे महत्वपूर्ण खाते दिले जाणार आहे. गुरूवारी(ता.०५) मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत २० हुन अधिक मंत्री देखील शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com