
Pune News : तमिळनाडूच्या १४ जिल्ह्यामध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून यामुळे १.५ कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. यावरून सोमवारी (ता.२) मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले. त्यांनी तमिळनाडूला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून २ हजार कोटी रुपयांची तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
२३ नोव्हेंबरला निर्माण झालेले फेंगल चक्रीवाद १ डिसेंबर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीदरम्यान कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीला धडकले. यामुळे विल्लुपुरम, कल्लकुरीची, कुड्डालोर आणि तिरुवन्नामलाई जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. येथे ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे देखील वाहत होते. तर मुसळधार पाऊस आणि सोसाट्यांच्या वाऱ्यामुळे धर्मपुरी, कृष्णगिरी, राणीपेट, वेल्लोर आणि तिरुपत्तुर जिल्हे देखील प्रभावित झाले.
१४ जिल्ह्यांमध्ये नुकसान
मुख्यमंत्री स्टालिन यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहलेल्या पत्रात, १४ जिल्ह्यांमध्ये फेंगलमुळे नुकसान झाले आहे. येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ९ टीम्स आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या ९ टीम्स तैनात करण्यात आहेत. सध्या १४ जिल्ह्यांमध्ये ३८ हजार सरकारी अधिकारी आणि १ लाख १२ हजार प्रशिक्षित समन्वयक बचाव आणि मदत कार्यात सहभागी झाले आहेत. तर प्रभावित झालेल्या लोकांना सर्व सुविधा राज्य सरकारकडून दिल्या जात आहेत. यासाठी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तर यामुळे चक्रीवादळामुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून १.५ कोटींहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. तर ६९ लाख कुटुंबे प्रभावित झाल्याचे देखील स्टालिन यांनी सांगितले आहे.
पायाभूत सुविधांसह शेतीचे नुकसान
स्टालिन यांनी आपल्या पत्रात पायाभूत सुविधांसह शेतीवर या चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे. विध्वंसक घटनेमुळे २, ४१६ झोपड्या, ७२१ घरांचे नुकसान झाले आहे. तर १ हजार ६५० ग्रामपंचात इमारती, ४ हजार २६९ अंगणवाडी केंद्र, २०५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५ हजार ९३६ शाळांच्या इमारती, ३८१ सामुदायिक हॉल आणि ६२३ पाणीपुरवठा केंद्रांचे नुकसान झाले आहे.
फेंगलमुळे ९६३ जनावरे दगावली असून २ लाख ११ हजार १३९ हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले आहे. रस्त्यांना मोठा फटका बसला असून ९ हजार ५७६ किलोमीटरचे नुकसान झाले आहे. १ हजार ६४९ वीज कंडक्टरचे नुकसान झाले असून २३ हजार ६६४ वीज खांब पडले आहेत. तर ९९७ ट्रांसफॉर्मरचे देखील नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
तसेच स्टालिन यांनी केंद्र सरकारकडून तमिळनाडूला या आपत्तीतून सावरण्यासाठी तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे. स्टालिन यांनी राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी २ हजार ४७५ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर विनाशाची तीव्रता लक्षात घेता, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत करावी. आणीबाणीच्या या काळात पुनर्वसनाच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी तमिळनाडूला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून २ हजार कोटी रुपयांची तातडीची मदत दिली जावी, अशी मागणी मुख्यमंत्री स्टालिन यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.