Apple Crop: बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनं फुलवली सफरचंदाची बाग

Team Agrowon

नियोजनातून फुलविली बाग

आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील घुले या कुटूंबाने कष्ट, नियोजनातून फुलविली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी निश्चितच प्रगती साधू शकतो.

Apple Crop | Agrowon

सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग

राज्यात प्रथमच सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग महिला शेतकरी विजया गंगाधर घुले यांनी आष्टी तालुक्यातील केळसांगवी सारख्या छोट्याशा खेडेगावात यशस्वी करून दाखवला आहे.

Apple Crop | Agrowon

मिश्र शेती

विशेष म्हणजे विजया घुले आणि शिक्षक दत्तात्रय घुलेसर या दोन्ही माय लेकराने बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागात आधुनिक शेतीची कास धरल्यामुळे परिसरातील शेतकरी देखील आता या प्रगतशील शेतीला भेटी देऊ लागले असून अनेक झाडे एकत्रित लावून मिश्र शेती निर्माण केली आहे.

Apple Crop | Agrowon

दुष्काळी बीड जिल्ह्यातील गोष्ट

हे राज्यातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांना आदर्श घ्यावा अशी शेती दुष्काळी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील केळसांगवी या गावात पाहावयास मिळत आहे.

Apple Crop | Agrowon

हरमन जातीची सफरचंद

चार एकर जमीन असून, त्यातील दोन एकरमध्ये त्यांनी फळझाडे लावली आहेत. त्यांची दोन्ही मुले परगावी नोकरीनिमित्त असतात. गावाकडच्या शेतीची सर्व जबाबदारी त्यांच्या आई सांभाळतात. त्यांनी २०२० साली १२×१० या अंतरावर हिमाचल प्रदेश येथून हरमन जातीची उष्ण प्रदेशात येणारी सफरचंदाची रोपे आणली.

Apple Crop | Agrowon

सफरचंदाची फळे लगडली

ती रोपे चांगले जोपासून तीन वर्षानंतर आता यावर्षी सफरचंदाला फळ आले आहेत. मोठ्या प्रमाणात फळे आल्याने उष्ण प्रदेशात ही सफरचंदाची शेती होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. एक एकर क्षेत्रामध्ये २४० झाडे लावले आहेत. सध्या प्रत्येक झाडाला दहा ते वीस किलो पर्यंत सफरचंदाची फळे लगडली आहेत.

Apple Crop | Agrowon
Honey bee | Agrowon