Team Agrowon
दैनंदिन आहारात मेथीचा वापर होतो. मेथी ही भाजी अनेकांच्या आवडीची असते. त्यामुळे मेथीला वर्षभर चांगली मागणी असते. मेथी हे कमी कालावधीचे भाजीपाला पीक असून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक आहे.
भाजीचा सतत पुरवठा होत राहावा यासाठी टप्प्या-टप्याने मेथी पिकाची लागवड करून वर्षभर मेथी पिकाची उपलब्धता करता येऊ शकते.
मेथी पिकाच्या मुख्य पीक म्हणून एक हेक्टर लागवडीसाठी पंचवीस ते तीस किलो बियाणे लागते.
मेथी ची दोन प्रकारे लागवड करता येते. मुख्य पीक म्हणून आणि आंतरपीक म्हणून .
आंतरपीक घेताना आवश्यकतेनुसार बियाण्यांचे प्रमाण घ्यावे.
बियाणे पेरताना एकसारखे आणि पातळ सोडावे.
मेथी पीक जातीनूसार ४० ते ६० दिवसात तयार होते. उत्पादन हेक्टरी ७ ते ८ टनापर्यंत मिळते.