Water Crisis : पावसाळा संपत आला तरी बंधारे कोरडेच

Drought Condition : गतवर्षी शंभर टक्के तुडुंब भरलेले बंधारे यंदा अर्धवट स्थितीत असून येणाऱ्या हंगामात शेतीसह पिण्याचे पाणी, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहेत.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Latest Agriculture News : पैठणपासून गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या विविध बंधाऱ्यात पावसाळा संपत आला तरीही जलसाठा वाढलाच नाही. गतवर्षी शंभर टक्के तुडुंब भरलेले बंधारे यंदा अर्धवट स्थितीत असून येणाऱ्या हंगामात शेतीसह पिण्याचे पाणी, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे.त तर बंधाऱ्याखालील अनेक गावांतील नदीपात्र कोरडेठाक राहणार आहेत.

परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील बंधाऱ्यामुळे घनसावंगी, परतूर तर पलीकडच्या काठावरील गेवराई, माजलगावसह विविध गावांना शेतीसाठी पाणी मिळते. या पाण्यावर मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. गेल्यावर्षी सर्व बंधारे शंभर टक्के भरले होते.

Water Shortage
Marathwada Water Crisis : मराठवाड्यात यंदा रब्बीची वाट अवघड ; २४ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

यावर्षी मात्र एकही बंधारा शंभर टक्के भरला नसून मोठा पाऊस नसल्याने नदी-नाले, तलाव, विहिरी, कूपनलिका तहानलेल्याच आहेत. दरम्यान बंधाऱ्यात पाणी नसल्याने यंदा गोदाकाठच्या परिसराला दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे, तर बंधाऱ्याखालच्या नदीपात्रांचे मात्र वाळवंट होणार आहे.

Water Shortage
Water Crisis : राज्यात ३२४ टॅंकर सुरू

राजाटाकळी-शिवणगाव बंधाऱ्याखालील भादली, सिरसवाडी, गुंज यासह पलीकडच्या काठावरील अकरा गावांतील शेतकऱ्यांना दरवर्षीच पाण्यासाठी आंदोलने करावी लागतात. पावसाळ्यात गोदावरीला पूर येतो तर कधी वरचे बंधारे ओव्हरफ्लो झाल्यास गोदावरीत पाणी सोडल्या जाते.

हे पाणी सरळ खाली लोणीसावंगीच्या बंधाऱ्यात जाते. पुन्हा पात्र कोरडेठाक राहते. गुंज येथे मिनी बंधाऱ्याची मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. यामुळे या लोकांची परिस्थिती धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच असते.

दोन वर्षांपासून गोदावरीवरील बंधारे भरतात. यामुळे गोदावरी नदीत पाणी सोडल्या जाते. या पाण्यावर अनेक शेतकरी शेती करतात. यावर्षी मोठा पाऊसही नाही, पावसाळ्यातही गोदावरीला पाणी आले नाही. आता शिवणगाव बंधाराही अर्धाच भरल्याने यावर्षी जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न गंभीर होणार आहे.
- माऊली कचरे, शेतकरी, गुंज
बंधाऱ्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात बागायती केल्या जाते. ऊस, केळी ही पिके घेतली जातात. यावर्षी बंधाऱ्यातील जलसाठा पाहता नवीन ऊसाची लागवडही करता येणार नाही. बंधाऱ्यातील पाणी राखीव ठेवावे लागणार आहे. जनावरांच्या चाऱ्यापाण्याचा प्रश्‍नही गंभीर होणार आहे.
- नितीन तौर, शेतकरी, शिवणगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com