Animal Market : सर्जा- राजाची बैलजोडी गायब, पश्चिम महाराष्ट्रातील जनावरांच्या बाजारात बैल विक्री उलाढाल ठप्प

Market Yard : बाजार समितीचा आवार देखण्या बैलजोडीने फुलून जायचा. मात्र, यंदा वर्षभरात एकाही बैलजोडीची आवक झाली नाही.
Animal Market
Animal Marketagrowon

Kolhapur Bull Market : महाराष्ट्राच्या कोल्हापूर आणि कर्नाटकातील बेळगावी या जिल्ह्याच्या सीमेवर सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरतो; पण गेल्या काही वर्षांपासून आठवडा बाजारात बैलजोडीची आवक घसरत गेली. यंदा तर हंगाम संपत येऊनही एकाही बैलजोडीची आवक नोंद झालेली नाही. बैलजोडीच्या व्यवस्थापन खर्चात झालेली भरमसाट वाढ आणि शेती कामासाठी यांत्रिकीकरणाचा अधिक वापर यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

येथील जनावरांचा आठवडा बाजारात म्हशी, शेळ्या - मेंढ्या, गाई, बैलजोडी यांची अधिक आवक असते; पण दशकभरापासून बैलजोड्यांच्या आवकेत लक्षणीय घट झाली. खासकरून कोरोनानंतर तर केवळ हातावर मोजण्याइतपत बैलजोड्या येत होत्या. सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात ऊस वाहतुकीच्या बैलगाड्यांसाठी तर मार्च-एप्रिल महिन्यात खरीप हंगामाच्या तयारीसाठी बैलांच्या बाजारात उलाढाल वाढायची.

अधिकाधिक २५० तर किमान ५० बैलजोड्यांची आवक नोंदायची. त्यामुळे बाजार समितीचा आवार देखण्या बैलजोडीने फुलून जायचा. मात्र, यंदा वर्षभरात एकाही बैलजोडीची आवक झाली नाही.

बैलजोडीसाठी लागणाऱ्या वैरण आणि पशुखाद्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच बैलजोडी सांभाळण्यासाठी मनुष्यबळ मिळणे मुश्किल बनले आहे. तुलनेत ट्रॅक्टरमुळे शेतातील कामे कमी खर्चात होऊ लागली आहेत. त्याचा व्यवस्थापन खर्चही बैलजोडीच्या तुलनेत कमी आहे. साहजिकच बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरनेच शेतीकाम करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.

Animal Market
Vegetable Market Kolhapur : दोडका, वांगी, फ्लॉवर गड्डा, कोबी, गवारची दर तेजीत, भाजीपाला आवक घटली

या सर्वांचा परिणाम, शेतकऱ्यांच्या गोठ्यातून सर्जा- राजाची बैलजोडी गायब होण्यात झाला. त्यामुळे जनावरांच्या वाढला. या सर्वांचा परिणाम, शेतकऱ्यांच्या गोठ्यातून सर्जा- राजाची बैलजोडी गायब होण्यात झाला. त्यामुळे जनावरांच्या बाजारातील बैलजोड्यांची आवक दुर्मिळ झाली.

बैलजोडीच्या देखभालीसाठी एक गडी कायमस्वरूपी लागतो. हा गडी मिळणे आणि सांभाळणे महागाईत दुरापास्त आहे. पूर्वी ६० रुपयाला मिळणारे पोते आज त्या रकमेत कुळथी किलोभर सुद्धा येत नसल्याने बैलजोडी बाळगणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे मत बैलजोडी पालकांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com