Broiler Poultry Farming: ब्रॉयलर कुक्कुटपालनात आरोग्य, खाद्य व्यवस्थापनावर भर

Poultry Business: साताऱ्यातील सोमनाथ ब्रम्हदेव घाडगे यांनी ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करत ज्या अत्यंत प्रभावी नियोजनाने आणि स्वच्छतेवर भर दिला आहे, त्याने त्यांना यशाची शिखरे गाठली आहेत. या व्यवसायातील त्यांचे अनुशासन आणि पाणी व्यवस्थापन हे इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहे.
Poultry
PoultryAgrowon
Published on
Updated on

Poultry Farming Management:

शेतकरी नियोजन । ब्रॉयलर कुक्कुटपालन

शेतकरी : सोमनाथ ब्रम्हदेव घाडगे

गाव : कामेरी, ता. जि. सातारा

शेड क्षमता : २५०० ब्रॉयलर पक्षी

वार्षिक बॅच : ५ ते ६

कामेरी (ता. जि. सातारा) येथील सोमनाथ ब्रम्हदेव घाडगे हे प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांची स्वतःची साडेचार एकर बागायती शेती आहे. त्यात ऊस हे प्रमुख पीक आहे. शेतीला पूरक व्यवसाय करावा, असे त्यांना सातत्याने वाटत होते. दरम्यानच्या काळात करार पद्धतीने कुक्कुटपालनाचे व्यवसाय बघण्यात आला. हा व्यवसाय चांगला वाटल्याने परिसरात सुरू असलेल्या पोल्ट्री युनिटची माहिती घेतली.

Poultry
Poultry Farming: शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवसाय – कुक्कुटपालनाचा सुवर्णकाळ!

करार पद्धतीने ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसाय केल्यास इतर व्यवसायांच्या तुलनेत त्यास भांडवल कमी लागणार होते. त्यासाठी स्वतःकडील थोडे पैसे व काही पैसे बँकेकडून कर्ज घेऊन उभे केले. पोल्ट्रीसाठी २००७ मध्ये १४० बाय २० फूट लांबी रुंदीचे पूर्व पश्चिम दिशेचे शेड उभारले. या शेडची क्षमता सुमारे २५०० पक्षी इतकी आहे. त्यानंतर खासगी कंपनीसोबत करार करून ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात केली.

पोल्ट्री व्यवसायास सुरुवात केल्यानंतर पहिल्या बॅचमध्ये थोड्या अडचणी आल्या. मात्र हळूहळू व्यवसायातील बारकावे समजू लागले. पक्ष्यांमध्ये हंगामनिहाय होत असलेले बदल समजून घेत नियोजन सुरू केले. कोंबडीखताचा वापर स्वतःच्या शेतामध्ये केला. यामुळे रासायनिक खतावरील खर्च कमी झाला. योग्य नियोजनातून वर्षाकाठी पक्ष्यांच्या पाच ते सहा बॅच घेतल्या जातात.

Poultry
Poultry Farming : पोलिस सेवेतून निवृत्त, आता देशी पोल्ट्री व्यवसायात यशस्वी

नियोजनातील बाबी

वर्षाकाठी पाच ते सहा बॅचच्या घेतल्या जातात. प्रत्येक बॅच संपल्यानंतर शेडमधील कोंबडीखत बाहेर काढले जाते. त्यानंतर पक्षी शेडचे निर्जंतुकीकरण केले जाते. जेणेकरून पुढील बॅचमधील पक्ष्यांना आजाराची बाधा होणार नाही.

निर्जंतुकीकरण केल्यानंतर चुना आणि त्यात मोठ्या मिठाचा वापर केला जातो. ब्रॉयलर शेडवर आणण्यापूर्वी खाद्य तसेच पाण्याची भांडी स्वच्छ करून ठेवली जातात. भांड्यांचे देखील निर्जंतुकीकरण केले जाते.

ब्रॉयलर पक्ष्यांना स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी शेडवर पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. उन्हाळ्यात ब्रॉयलर पक्ष्यांना थंड पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या टाक्यांना गोण्या बांधल्या जातात. शेडमधील तापमान कमी करण्यासाठी फॉगर व फॅन लावले जातात. साप, धामण या सारखे सरपटणारे प्राणी पोल्ट्रीमध्ये शिरकाव करण्याची शक्यता असते. त्यासाठी रासायनिक पावडर शेडच्या चारही बाजूंनी टाकली जाते.

स्वच्छ पाणी उपलब्धतेवर भर

ब्रॉयलर पक्ष्यांना पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध करण्यावर भर दिला जातो. पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये ठराविक कालावधीनंतर शेवाळाची वाढ होते. त्यामुळे पाइप नियमितपणे स्वच्छ केल्या जातात.

उन्हाळ्यात भूजल पातळी कमी होते. त्यामुळे पाण्याचा पीएच (सामू) नियमित तपासला जातो. योग्य प्रमाणात सामूचा समतोल राखून पाणी दिले जाते.

बॅच नियोजन

बदलत्या हंगामानुसार ब्रॉयलर संख्या ठरवली जाते. सर्वसाधारणपणे ३५ ते ४५ दिवसांत एक बॅच पूर्ण होते. त्यानुसार बॅच घेण्यासाठी ब्रॉयलर संख्या ठरविली जाते.

ब्रॉयलर पक्षी शेडवर आणल्यानंतर तीन, बारा व २१ व्या दिवशी एनडी आणि आयबीएचचे लसीकरण केले जाते. डोळ्यातून आयव्ही लस दिली जाते.

ब्रॉयलर पक्ष्यांना कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तज्ज्ञांकडून प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर भर दिला जातो. वेळापत्रकानुसार नियमित लसीकरण केले जाते.

- सोमनाथ घाडगे ९४२१२१५९७५

(शब्दांकन : विकास जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com