Broiler Chicken Rate : दबावात असलेल्या ब्रॉयलर चिकनच्या दरात सुधारणा

Broiler Chicken Update : मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्‍वभूमीवर जल्लोष आणि पार्टीचा बेत आखला जात आहे.
Broiler Chicken
Broiler ChickenAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्‍वभूमीवर जल्लोष आणि पार्टीचा बेत आखला जात आहे. त्यातूनच पोल्ट्री उद्योग क्षेत्रालाही अपेक्षा असून, गेल्या काही दिवसांपासून दबावात असलेल्या ब्रॉयलर चिकनच्या दरात त्यामुळेच तेजी अनुभवली जात आहे. यापुढील काळात दरात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्‍त केली आहे.

करारावर कुक्‍कुटपालन करणाऱ्या कंपन्यांकडून कमी पशुखाद्याचा वापर करीत पक्ष्याचे अधिक वजन मिळावे यावर भर राहतो. त्यामुळेच बाजारात कंपन्यांकडून साडेतीन ते चार किलो वजनांच्या पक्ष्यांचा पुरवठा करण्यात आला होता. अधिक वजनाचे पक्षी बाजारात आल्याने मागणीत घट नोंदविली गेली.

Broiler Chicken
Broiler Chicken Productivity : ब्रॉयलर चिकनच्या उत्पादकता खर्चात वाढ

त्यामुळे ब्रॉयलर चिकनचा बाजार दबावात आला, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. ब्रॉयलर पक्ष्यांचा उत्पादकता खर्च प्रति किलो ८० रुपये असताना बाजारातील दर प्रति किलो ७० रुपयांपर्यंत खाली आले होते. परिणामी, पोल्ट्री क्षेत्राचे अर्थकारण प्रभावीत झाले. याविषयी ओरड होताच महाराष्ट्रातील अधिक वजनाच्या पक्ष्यांची उचल करीत छत्तीसगड, दिल्ली या भागांत माल पाठविण्यात आला.

त्यामुळे महाराष्ट्रातील माल कमी झाल्याने मागणी वाढली, हे देखील दरवाढीमागील एक कारण सांगितले जाते. त्यासोबतच ३१ डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप त्यासोबतच नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात होते. त्याकरिता पार्ट्यांचे आयोजनही केले जाते. त्यातूनच मांसाहाराची मागणी वाढते, असा अनुभव आहे. त्याचाही परिणाम दरावर होत ब्रॉयलर चिकनचे दरात वाढ नोंदविली गेली आहे. मध्य प्रदेश मध्ये ९५, छत्तीसगड १०५ तर विदर्भात ८५ पश्‍चिम महाराष्ट्र ८० रुपये प्रति किलोवर दर पोहोचले आहेत.

Broiler Chicken
Broiler Chicken Rate : ब्राॅयलर कोंबडी टोमॅटोपेक्षाही स्वस्त

पशुखाद्याच्या दरात घसरण

दर २९०० रुपयांवरून २४०० रुपये क्‍विंटलवर आले आहेत. सोया पेंड २९०० व त्यात पाच टक्‍के जीएसटी मिळून तीन हजार रुपये क्‍विंटल (३० हजार रुपये टन) असा दर आहे. यापूर्वी सोयापेंडचे दर ४४०० क्‍विंटलवर होते. पशुखाद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांना बऱ्याच अंशी दिलासा मिळाला आहे.

नव्या वर्षाच्या स्वागताला अवघे १५ दिवस उरले आहेत. परिणामी, मागणी वाढल्याने पोल्ट्री क्षेत्रात सुधारणा अनुभवली जात असून, दर ७० रुपये प्रति किलोवरून ८० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यापुढील काळात यात आणखी तेजीची शक्‍यता आहे.
शुभम महाले, संचालक, अमरावती पोल्ट्री असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com